

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 30 सप्टेंबर):-पंचायत समिती, उमरखेड यांच्या मध्मातून दिनांक 27 ते 29 सप्टेंर 2022 पर्यंत ग्राम रोजगार सेवकाना तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्राम रोजगार सेवकाची भूमिका, दसवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा या बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात गावात शिवार फेरी करून शेतात कामे कसे कराचे व गाव फेरी घेऊन गावात कोणत्या कामाची गरज आहे व कसे करायचे हे देखील मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम नंदकुमार रोहोयो सचिव, शंतनू गोयल आयुक्त नरेगा नागपूर हे महाराष्ट्रात राबवत आहे.
उमरखेड तालुक्यातील जिजाऊ भवन, उमरखेड येथे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणला तहसीलदार आनंद देऊळगावकर गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे,अमोल चव्हाण विस्तार अधिकारी ,पांडुरंग माने विस्तार अधिकारी, प्रशिक्षक ललित तराळ, प्रीती तायडे उमरखेड येथील नरेगा कर्मचारी सहायक कार्यक्रम अधिकारी जयशंकर राठोड, तांत्रिक साहाय्यक विजय जाधव, विशाल राठोड, शैलेश त्रिवेदी, विशाल पाईकराव,अतुल भुसावार, नंदकिशोर बोडके व तालुक्यातील संपूर्ण ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.