वेकोली वर्धा व्हॅलीच्या संयुक्त महासचिव पदावर प्रमोद अर्जुनकर यांची नियुक्ती

18

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

सिटूचे दहावे केंद्रीय अधिवेशन घुग्घूस येथील गांधी चौकात नुकतेच सपन्न झाले.या अधिवेशनाला माजी खासदार व ऑल इंडिया कोल वर्कर्स फेडरेशन कोलकाताचे अध्यक्ष वासुदेव आचार्य,एआयसीडब्लू एफचे महासचिव डी.डी. रामानंदन,राष्ट्रीय उपाध्यक्ष व अध्यक्ष राज्य कमेटी सिटू महाराष्ट्रचे डॉ.डी.एल.कराड, राष्ट्रीय सचिव व महासचिव राज्य कमेटी सिटूचे प्रमोद प्रधान, डी.के.दत्ता, महाराष्ट्र राज्य कमेटी सिटू उपाध्यक्ष सईद अहमद,म. प्र. राज्य कमेटी अध्यक्ष रामविलास गोस्वामी,अरुण लाटकर व वेकोलीचे कामगार उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात विविध मुद्यावर चर्चा करण्यात येऊन सात प्रमुख पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये वेकोली वणी क्षेत्राचे महासचिव प्रमोद मारोतराव अर्जुनकर यांची वेकोली वर्धा व्हॅलीचे संयुक्त महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती बद्दल वणी क्षेत्र सेफ्टी सदस्य प्रमोद पानघाटे, वणी क्षेत्र सेफ्टी सदस्य राजू सूर्यवंशी, सतीश गोहे, गणेश डांगे, विनोद बुटले, गुलाब आवारी, पांडुरंग डाखरे, सुमन सिन्हा, गजेंद्र कुमार, दिपक लोनगाडगे, एस. जे. बिसेन, प्रशांत ताजने व दिपक बालबुके यांनी शुभेच्छा दिल्या