

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.1ऑक्टोबर):-चार वर्षे शिका मेहनत घ्या आणि पुढचे सर्व आयुष्य मजेत आणि आनंदाने जगा शिस्तीत शिका आयुष्याचे कल्याण होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले आहे.
गढी येथील जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशीं संवाद साधत सांगितले. जयभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य वसंत राठोड, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. शिवाजी पवळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बंडू शेवाळे, यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पल्लवी जाधव यांनी तब्बल दोन तास विद्यार्थांना मार्गदर्शन करून त्यांना मंत्रमुग्ध केले. शिवाजीराव पंडित यांनी स्थापन केलेल्या या जयभवानी शिक्षण स्कुलात तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करा आणि या संस्थेचे आणि आपले तसेच आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असेही त्यावेळी पल्लवी जाधव म्हाणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नंदकिशोर तळेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा. डेंगळे, प्रा. शेख खेसर, प्रा. शिवाजी जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, उपस्थित होते