चिमुर येथे राष्ट्रपिता महत्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार समारंभ , देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम व प्रविण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भीम्स आयोजित

27

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमुर(दि.1ऑक्टोबर):-क्रांती भुमित पहिल्यांदा शहर काँग्रेस कमिटी, व विधासभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमुर येथे अभ्यंकर मैदान म्हणजे किल्यावर ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले असे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दि. २ ऑक्टोंबर रोजी रविवारला सायंकाळी ठीक ५ वाजता अभ्यंकर मैदान चिमुर येथे आयोजित करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार सोहळा व प्रवीण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भिम्स भजनसंध्या, देशभक्ती गीत संगीत कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वारजुकर (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , मुंबई) कार्यक्रमाचे उद् घाटक संदेश सिंगलकर (सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी),कार्यक्रमाचे सह उद्घाटक डॉ.नामदेव किरसान (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ.सतिश भाऊ वारजुकर (समन्वयक, विधानसभा चिमुर), प्रकाश सांकपाळ (उपविभागीय अधिकारी चिमुर), प्राजक्ता बुरांडे (तहसीलदार चिमुर), डॉ.सुप्रिया राठोड (मुख्यधीकारी, नप. चिमुर ), मनोज गभने( पोलिस निरीक्षक) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चिमुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केले आहे.