माहितीचा अधिकार दिनानिमित्त विठ्ठलवाडा शाळेत पार पडली प्रश्नमंजुषा स्पर्धा

17

🔸स्पर्धेच्या युगात सामान्यज्ञान माहीत असणे आवश्यक-गौतम उराडे

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.1ऑक्टोबर):-आंतरराष्ट्रीय माहीती अधिकार दिन या दिनानिमित्त जि प उ प्राथमिक शाळा विट्ठलवाडा येथे मान गौतम उराडे सर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग 6 वी, 7वी च्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 6-6 विद्यार्थ्यांचे 4 गट तयार करण्यात आले. गट 1 ला सावित्रीबाई फुले, गट 2 ला बाबासाहेब आंबेडकर, गट 3 ला शिवाजी महाराज, गट 4 ला महात्मा फुले नाव देण्यात आली. यावेळी प्रत्येक गटाला सामान्यज्ञानावर प्रश्न विचारण्यात आले तसेच गणित, भाषा, इतिहास, भूगोल, हिंदी,विज्ञान या विषयावर प्रश्न विचारण्यात आले. जोप्रश्न एकाही गटाला आला नाही तो प्रश्न इतर वर्गातील मुलांना (audiance poll) विचारण्यात आला.

चारही गटात चुरस तयार झाली. कधी पहिला गट समोर तर कधी दुसरा गट समोर अस चित्र होत होत. शेवटच्या राउंड पर्यंत चुरस कायम होती. शेवटी 70 गुण घेऊन महात्मा फुले गटांनी बाजी मारली. विजेत्या गटाला शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आली. या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन व नियोजन विठ्ठल गोंडे सर यांनी केले. तर मूल्यमापनाच उत्कृष्ट काम गौतम उराडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमरे सर, मोरे सर, कोकुलवार सर, गेडाम सर, चौधरी मॅडम यांनी सहकार्य केले.