3ऑक्टोंबर ला आरक्षण हक्क कृती समिती चे जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.2ऑक्टोबर):- भंडारा जिल्हा आरक्षण हक्क समिती च्या वतीने मागासवर्गीयांवरील अन्याया विरुद्ध अनुसुचीत जाती अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती यांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी केंद्र व राज्य सरकारविरोधात लढा बुलंद करण्यासाठी दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम, नागपूर ते विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश मोर्चात मागासवर्गीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भंडारा जिल्हा आरक्षण हक्क कृती समिती तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

देशात स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना आजही बेरोजगारी, महागाई, धर्मांधता यामुळे भयावह वातावरण निर्माण होत असून, भयंकर जातीयवाद फोफावला आहे. संविधानावर अतिक्रमण होत असल्याने नवीन पिढीचे भवितव्य धोक्यात आहे. वाटेल तशी मनमानी सुरू असून बेजबाबदार पणे सरकार वर्तन करत . जनतेच्या आवश्यक गरजांकडे कोणाचे लक्ष नाही. आता जनआक्रोश मोर्चामार्फत जनजागृती करणे उदिष्ट् असून प्रमुख मागणी म्हणजे महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीतील जे आरक्षण रद्द केले आहे, तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण पूर्ववत करणे, देशातील कामगार हित्ताचे 44कायदे रद्द करून जे कामगार व कामगार विरोधी 4कायदे रद्द करण्यात यावे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये v विद्यापीठात मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती.फ्रीशिप योजणा सुरू करणे, शासकीय नोकऱ्या ,कंपन्या,बँक अश्या विविध क्षेत्रांत कत्राटी बंद करून रितसर आरक्षण देवून रिक्त जागा भरती करने, विशेष भरती मोहीम राबवून रिक्त पदभरती करणे सविधानिक नियमाने ओ बी सी ना राजकीय व नोकरीच्या क्षेत्रात आरक्षण लागू करावं. मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र न्यायालय, स्थापन करणे, शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चावर अंकुश लाऊन त्यांना कर्जबाजारी होन्यापासून सरक्षण देणा-या योजना लागू करणे, आदिवासी आश्रमशाळेमध्ये नामांकित इंग्रजी शाळा सुरू करण्यात यावी, अशा अनेक मागण्या घेऊन या जन आक्रोष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या जन आक्रोश आंदोलनात सर्व जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारा जिल्हा आरक्षण हक्क कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष अजबराव चीचामे,सरचिटणीस श्यामराव नागदेवे,उपाध्यक्ष गोपाल सेलोकर, कोषाध्यक्ष नरेन्द्र रंगारी, गोवरधन कुंभरे, अचल मेश्राम, मिलिंद जनबंधू, पौर्णिमा साखरे, अनील धमगाये, श्याम बिलवणे, प्रभाकर रामटेके, घनश्याम मडावी, रीमदेव राऊत, सुनील तरजुले,सुरेश राऊत, युगांतर कांबळे,कार्याध्यक्ष सूर्यकांत हूमने, शशीकांत भोयर, सोपचंद सिरसाम, रजनी वैद्य, भैयाजी लांबट,श्याम गावळे, हरिश्चंद्र धांडेकर तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भंडाराचे अध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सचिव डॉ. प्रमोद वरकडे, उपाध्यक्ष डॉ. मधुकर कुंभरे, सल्लागार अजाबराव चिचामे, डॉ. किशोर कुंभरे, डॉ. ताराचंद येळणे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मडावी, गणपत मडावी, एकनाथ मडावी, शत्रुघ्न कोळवती, नरहरी वरकडे, पूनम वरकडे, पी. एल. खंडाते, हेमराज चौधरी, , डॉ. सविता मालडोंगरे, शोभा इळपाते, आदींनी केले आहे