युवक काँग्रेसतर्फे ब्रम्हपुरी भव्य गरबा महोत्सव साजरा

15

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 2ऑक्टोबर):-युवक काँग्रेस ब्रम्हपुरी च्या वतीने झाशी राणी चौक बस स्टॅप रोड ब्रम्हपुरी येथे राज्यस्तरीय दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेच्या कार्यकमाचे उदघाटक माजी मंत्री तथा आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार, याच्या शुभ हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून,प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, प्रमुख अतिथी बांधकाम सभापती विलासभाऊ विखार,नगरसेवक डाँ.नितीनभाऊ उराडे,नगरसेवक हितेंद्रजी धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी,माजी नगरसेवक बंटीभाऊ श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच सोनू नाकतोडे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज मेश्राम, अमित कन्नके,प्रकाश खोब्रागडे, अनिकेत उराडे,प्रतीक नरड, शुभम राऊत, रक्षित रामटेके,डेनी शेंडे,सोनू पठाण,सचिन चौधरी,सुशांत बनकर व युवक काँग्रेसचे इतर सदस्य उपस्थित होते.

राज्य स्तरीय गरबा स्पर्धेत प्रथम पुरस्कार- स्टार ग्रुप सडक अर्जुनी व माऊली ग्रुप,भंडारा व ,द्वितीय पुरस्कार- एक्स्प्रेशन ग्रुप नागपूर तर तृतीय पुरस्कार जय माता दि ग्रुप व गडचांदूर यांना संयुक्त पुरस्कार देण्यात आला.या गरबा दांडिया स्पर्धेत नागपूर,चंद्रपूर, भंडारा,सडक अर्जुनी, चिमूर, पवनी, गडचांदूर व इतर तालुका व जिल्ह्यातील टीम ने उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला.या भव्य राज्य स्तरीय गरबा महोत्सवाला ब्रम्हपुरी व बाहेरील खूप मोठा जनसागर उपस्थित होता.