लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी आयोजित वाचन चळवळ

18

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2ऑक्टोबर):-परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वाचन चळवळ या कार्यकर्माचे आयोजन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे लहान मुलांना वाचण्याची आवड व्हावी तसेच मोबाईल मधील गेमपेक्षा मैदानी खेळ हे शारीरिक व मानसिक विकास कसा करतात याचे महत्त्व पटवुन देण्यासाठी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे आदरणीय विनोद शेंडगे सर यांचे व्याख्यान अनेक नवरात्र उत्सव मंडळ यांच्या आरतीचे वेळी देण्यात आले.

यावेळी बालक आणि महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच त्यांच्या कडुन वाचन चळवळ व मैदानी खेळ खेळण्याचे वचन सुद्धा घेण्यात आले.याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे सचिव भगत सुरवसे कॅबिनेट ऑफिसर अतुल दादा गंजेवार लॉयन्स जगन्नाथ आंधळे,मोहन गिते,शिवम गिरी, देवानंद जोशी,क्रष्णा पतंगे आदी नागरिक उपस्थित होते.