संविधान चौक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार व विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार!

22

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2ऑक्टोबर):-सविधान चौक प्रतिष्ठान तथागत नगर, पुसदच्या वतीने एका सामाजिक उपक्रमा अंतर्गत आपल्या समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार तथा संघटनेच्या विविध पदाधिकारी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी भोजनदान वाटपाचा कार्यक्रम ही घेण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की काही महिन्यापूर्वी तथागत नगर येथील युवक तथा ज्येष्ठ नागरिकांनी एका चांगल्या उपक्रमाची निर्मिती करून शासकीय विश्रामगृह शेजारी असलेल्या तथागत नगर स्थित संविधान चौक प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली.

या प्रतिष्ठानची निर्मिती झाल्यानंतर विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले प्रथम भोजन दान वाटप करण्यात आले.
तेव्हापासून या उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे भुकेल्यांना अन्न द्या या विचाराचे पालन करून प्रथम भोजनदान वाटप करण्यात येत् आहे भोजन वाटप अविरतपणे भविष्यात हे चालू राहणार आहे.आज १ ऑक्टोबर २०२२या पावन पर्वावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र कांबळे तसेच त्यांचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यांनी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, विविध संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष,ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते तथा मार्गदर्शक भीमरावदादा कांबळे, प्रमुख पाहुणे,भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, पत्रकार राजेश ढोले, लक्ष्मण कांबळे, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र नाईक, पत्रकार दिनेश खांडेकर, कैलास श्रावने,इत्यादी चा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमाला संविधान प्रतिष्ठानचे संविधान चौक प्रतिष्ठानचे पदाधिकारी,अध्यक्ष इंजिनीयर महेंद्र कांबळे, सुखदेवराव भगत, ल.पु .कांबळे, विजय कांबळे, सोमेश्वर जाधव, साहेबराव खिल्लारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि. महेंद्र कांबळे, प्रशांत ढवळे, नितीन डोंगर दिवे , सुरज वरठी , संजू, संजू नाग अलवार प्रा. चेतन कांबळे, शेखर दुथडे, प्रतीक पठाडे, सत्यजित भगत, सुमित कांबळे, गोपाल रामटेके, इत्यादी कार्यकर्ता पदाधिकारी तथा स्थानिक समाज बांधव उपस्थित होते.