नदीपात्रातून नावेने खुलेआम होत आहे दारु तस्करी

31

🔺नावेसह सहा आरोपी अटकेत;धाबा पोलीसांची कार्यवाही

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(7 जुलै):- वर्धा नदीचा पात्रातुन नावेने दारु तस्करी सूरु असल्याची माहीती धाबा पोलीसांना मिळाली.पोलीसांनी धाड टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतले. नावेसहीत 80 हजाराचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.या कार्यवाहीने दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाली खरी मात्र दारुबंदी नाममात्र उरली आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची तस्करी सूरु आहे. तस्करीसाठी नानाविध कल्पना तस्करांनी अमलात आनल्या. आता तर जिव धोक्यात घालून दारु तस्करी सूरु आहे. गोंडपिपरी तालुक्याला लागुनच तेलंगणाची सिमा आहे.महाराष्ट्र-तेलंगणाला वर्धा नदीचा पात्राने विभागले आहे. या नदी पात्रातुन दारु तस्करी केल्या जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस सूरु आहेत. वर्धा नदीचे पात्र दुथळी भरून वाहत आहे. धो धो वाहणाऱ्या नदीपात्रातुन नावेने तस्कर तेलंगणा गाठीत आहेत. तेलंगणातील दारू नावेने गोंडपिपरी तालुक्यात आनली जात आहे. किरमीरी घाटावर हा प्रकार सूरू असल्याची माहीती धाबा उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूशिल धोकटे यांना मिळाली. धोकटे यांनी पोलीस जवानांना घेऊन किरमीरी घाट गाठले. यावेळी तेलंगणातुन नावेने दारु येत होती. नाव किणारी लागताच पोलीसांनी धाड टाकली.
पोलीसांनी टाकलेल्या धाडीत 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बाळू ताजणे,प्रदिप उयके,सूनिल उयके,नागेश ठाकूर,बंडू पाल या आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सूशिल धोकटे,मनोहर मत्ते,हेमराज गुरनुले,प्रतिक ठेंबरे यांनी केली आहे..