

🔹स्थगितीमुळे १०२८ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न रखडणार !
🔸शाश्वत जलसंधारनातून ड्रायझोन मुक्ती साठी आमदार देवेंद्र भुयार यांचा प्रयत्न !
🔸विकास कामावरील स्थगिती उठविण्याची आ. देवेंद्र भुयार यांची मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.2ऑक्टोबर):- वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी मोर्शी वरुड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , माजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, यांच्या माध्यमातून मोर्शी वरुड तालुक्यामध्ये ३९ कोल्हापुरी बंधारे व द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण करण्याकरीता ४१ कोटी २९ लक्ष १० हजार ७१६ रुपये मंजूर करून घेतले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मोर्शी विधानसभा मतदार संघात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सरकारच्या या निर्णयामुळे ती रखडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मध्ये असून तेथे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असून मागील १२ वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे सिंचन प्रकल्पांचे काम रखडलेले असून ते सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठी वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त करण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कंबर कसली आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे शेतीसिंचनासाठी वरदान ठरनाऱ्या वरुड मोर्शी तालुक्यातील कोल्हापुर पद्धतीचे नवीन बंधारे, द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यात ३९ कोल्हापुरी बंधारे, द्वारयुक्त बंधारे निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करून सुमारे ४१ कोटी २९ लक्ष १० हजार ७१६ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती.
मात्र शिंदे सरकारच्या स्थगितीमुळे वरुड मोर्शी तालुक्यातील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे ३९ कोल्हापुरी बंधारे, द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण करणे करीता दिनाक ९ मे २०२२ रोजी मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेला स्थगिती दिल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील या ३९ द्वारयुक्त सिमेंट बंधारे व कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून १०२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास स्थगिती मिळाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
वरुड मोर्शी तालुक्यातील ३९ बंधारे निर्मितीसाठी महा विकास आघाडी सरकारने ४१ कोटी २९ लक्ष १० हजार ७१६ रुपये निधी मंजूर करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून मोर्शी विधानसभा मतदार संघातील जनहिताच्या विकास कामावरील स्थगिती उठविण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शाश्वत जलसंधारनातून ड्रायझोन मुक्ती साठी माझा प्रयत्न !
वरुड मोर्शी तालुक्याला ड्राय झोनचा लागलेला कलंक मिटविण्याकरीता, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरीता मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील जमिनीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी तसेच माझा मतदारसंघ ड्रायझोन पासून मुक्त व्हावा शेती सिंचनामुळे आर्थिक संपन्नता यावी, तरुण शेतकऱ्यांना वैभवशाली दिवस त्याच्या आयुष्यात निर्माण व्हावे याकरिता यशस्वी पाठपुरावा करून मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारनासाठी सिमेंट बंधारे द्वारयुक्त, कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याकरीता महाविकास आघाडी सरकारने ४१ कोटी २९ लक्ष रुपये मंजूर करून दिले मात्र त्या सर्व कामावर शिंदे सरकारने स्थगिती दिली असून ही स्थगिती तात्काळ उठविण्याची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे — आमदार देवेंद्र भुयार