

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे):-9075913114
बीड(दि.2ऑक्टोबर):-PM किसान योजनेतील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
केंद्र सरकार किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच 24 ऑक्टोबरला जारी करू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
दिवाळीपूर्वी 12 हप्ता मिळणार!
___________________________
वास्तविक गतवर्षी किसान सन्मान निधी योजनेचा ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता ९ ऑगस्टलाच जाहीर झाला होता, मात्र या वर्षी अद्याप त्याबाबत कोणतीही अपडेट नाही.
विशेष म्हणजे, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. या संदर्भात पीएम किसान निधीचा 12 वा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.
अशा लोकांच्या खात्यात पैसे येणार नाहीत
_______________________________
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अद्याप ई-केवायसी केलेले नाही. त्यांना 12वा हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसीसाठी 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती, जी संपली आहे.
नियमांनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने त्याचे ई-केवायसी केले नसेल, तर त्याचे पुढील हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
या योजनेंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हप्त्याची रक्कम जमा झाली आहे.
त्याचबरोबर बाराव्या हप्त्याचे पैसे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तसे, PM किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना 12वा हप्ता देण्याची वेळ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत आहे.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, शेतकरी हेल्पलाइन नंबर किंवा मेलद्वारे संपर्क साधू शकतात. ते टोल-फ्री नंबर 155261 किंवा 1800115526 वर कॉल करू शकतात किंवा 011-23381092 डायल करू शकतात. pmkisan-ict@gov.in वर ई-मेलद्वारे संपर्क करून ते तक्रारी नोंदवू शकतात.