करमाळा तालुक्यातील शेकडो महिलांचा प्रहार मध्ये प्रवेश..

21

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.2ऑक्टोबर):-परमपूज्य महात्मा गांधी जयंती चे निमित्त साधून मलवडी येथे करमाळा तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे व संघटक नामदेव पालवे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा लोकनायक वंदनीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचार प्रणालीने प्रभावित होऊन व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील आणि जिल्ह्यातील प्रहारच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कार्याने प्रभावित होऊन इतर पक्षातून तसेच सामाजिक संघटनेतून प्रहार मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वरचेवर वाढत असून आज करमाळा तालुक्यातील अनेक महिला भगिनींनी प्रहार मध्ये स्वतःला सामावून घेत सेवेचा वसा हाती घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील विधवा भगिनी असतील वृद्ध माता असतील अपंग असतील अन्यायग्रस्त भगिनी असतील सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात लढा उभा करणार असल्याचे सांगितले.यावेळी करमाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण संपर्कप्रमुख सागर पवार सरचिटणीस सोनू मखरे, युवा नेते दादा पालवे कृष्णा शिंदे प्रवीण मत्रे करमाळा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीताई अजय सुरवसे तालुका कार्याध्यक्ष वर्षाताई सलगर तालुका संपर्कप्रमुख कविताताई पालवे,शाखाध्यक्ष सोमनाथ जाधव अतुल गायकवाड सुरेखा देडगे,यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.