गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

16

🔸राष्ट्रीय सेवा योजना पुढाकार

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.4ऑक्टोंबर):- गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजना पुढाकार घेऊन व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेसाठी तीन विशेषज्ञ होते त्यातील चंदन सावते हे सीपी इंरो इमेंट एजन्सी मध्ये ऑपरेटर व पाणी फाउंडेशन व सरकारी संस्थांमध्ये काम केलेले आहेत, त्यासोबतच अमेरिका येथील डॉ. बेडशी व डॉ. ब्रिजू थांकाचन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी सोसायटी अँड विजिटिंग फॅकल्टी इन एज्युकेशन प्रोग्राम एज्युकेशन टेक्नॉलॉजी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व एन सी सी कॅडेट्स यांना व्यक्तिमत्त्व विकास याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संगणकाच्या साह्याने करण्यात येणाऱ्या विविध कामाची व वेबसाईट बद्दल माहिती देण्यात आली.
नवीन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देण्यात आली.

व्यक्तिमत्त्व विकास व संगणकीय ज्ञान यांचा जोड लावण्यात आला, अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांना आवश्यक आहे असे आयोजकांनी म्हटले, चंदन सावते यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुमचा पेहराव हा तुमच्या व्यक्तीमत्वाचा एक भाग असतो. यासाठीच नेहमी चांगला पेहराव करा. नीटनेटक्या आणि स्वच्छ पेहरावामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते.

कारण तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सर्वात आधी लोकांच्या नजरेत येतात ते तुमचे कपडे आणि पेहराव केलेल्या इतर गोष्टी. यासाठी टापटिप आणि आकर्षक राहण्याचा प्रयत्न करा.

यासाठी फार महागडे अथवा ब्रॅंडेड कपडे, शूज,बॅग्ज वापराव्यात असं मुळीच नाही. मात्र तुमचे कपडे नीटनेटके, स्वच्छ आणि व्यवस्थित असतील याची नक्कीच काळजी घ्या. विशेषतः ऑफिस इंटरव्यूव्ह, ऑफिस पार्टीज अशा ठिकाणी ड्रेसकोडप्रमाणेच पेहराव करा.

डॉ. ब्रिजू थांकाचन यांनी सांगितले की माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो.

शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो अथवा जी व्यक्ती रागीट, चिडचिड करणारी असते ती वेळ पडल्यावर योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे करिअरमध्ये उच्च शिखर गाठण्यासाठी तुम्हाला संयमाचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. ए. पी. मिटके, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन एस. एस. पाचकुडके व राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.