मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

15

🔹मोर्शी येथे स्टडी अकॅडमी करीता १ कोटी मंजूर केल्याबद्दल युवकांनी मानले आ.देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.4ऑक्टोबर):-तालुक्यातील ग्रामीण भागातील तरूण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेेला बसत असतांना पुस्तक महागडी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ती खरेदी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ही पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करून दिली तर युवकांचा ओढा ग्रंथालयाकडे वळेल व त्याचा गरीब मुलांना फायदाही होईल ही संकल्पना आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढे ठेवून मोर्शी येथे भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी निर्माण करण्या करीता १ कोटी रुपये निधी मंजूर करून मोर्शी येथे विद्यार्थ्यांच्या करियर च्या दृष्टीने मोर्शी तालुक्यातील युवक देशांच्या स्पर्धेत टिकावा या करिता भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी करिता आमदार देवेंद्र भुयार यांनी वैशिष्टपूर्ण निधीमधून १ कोटी रुपयांची तरतूद करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी अकॅडमी प्रोत्साहन देणारी ठरणार असून मोर्शी येथे भारत रत्न स्वर्गीय डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमी करीता १ कोटी रुपये मंजूर करून सर्व सेवा सुविधायुक्त डिजिटल स्टडी अकॅडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करून ते तंत्र आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार असून ख-या अर्थाने त्याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाचनाचा विकास होणार असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच मोर्शी शहरातील स्मशानभूमि विकास काम करण्याकरिता 14 व्या वित्त आयोग निधीमधुन 69 लक्ष 72 हजार रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली असून दोन्ही विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथे डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम स्टडी अकॅडमी निर्माण करण्याकरिता 1 कोटी रुपये मंजूर करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यात मोठा मोलाचा वाटा दिला त्याबद्दल मोर्शी तालुक्यातील युवकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, माजी नगराध्यक्ष सौ मेघनाताई मडघे, डॉ प्रदीपजी कुऱ्हाडे, उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशभाऊ विघे, माजी नगरसेवक नितीन पन्नासे, मोहन मडघे, नितीन उमाळे, प्रीतिताई राहुल देशमुख, क्रांतीताई चौधरी, सुनीताताई कोहळे, जीवन देशमुख, विनोद गेडाम, शेरा खान, संजय उल्हे, शरद कनेर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, शहर अध्यक्ष अंकुश घारड, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.