🔸बजरंग दल कडून किराणा व साहित्य…

✒️शेखर बडगे(अमरावती जिल्हा प्रतिनिधी)

मो:-9545619905

अमरावती(दि-7जुुुलै) नांदगांव पेठ येथील दुसरी महिला पॉजीटीव्ह आल्याने तिला कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन दिवसांपूर्वी ती घरी परतल्यानंतर सोमवारी बजरंग दल ने माणुसकी जोपासत त्या महिलेला किराणा साहित्य दिले.शिवाय कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर मात केल्याने कार्यकर्त्यांनी महिलेच्या कुटुंबावर फुलांचा वर्षाव देखील केला.
पहिली महिला पॉजीटीव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील दुसरी महिला क्वारंटाईन असतांना पॉजीटीव्ह आढळली होती. त्यामुळे कोविड रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्या महिलेला शनिवारी सुटी झाली. त्याआधी महिलेचा पती आणि मुलगा यांना सुटी झाली मात्र भाड्याच्या ठिकाणी राहत असल्याने त्यांना बाहेर दहा दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला ती महिला राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी दिल्याने सदर महिला कुटुंबासमवेत एका ठिकाणी राहत आहे.बजरंग दल चे विभाग संयोजक संतोषसिंह गहरवार यांनी त्या महिलेला किराणा साहित्य घेऊन दिले शिवाय कोरोनावर मात केल्याने कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबावर फुलांचा वर्षाव करून कोणतीही मदत लागल्यास निसंकोच सांगावे असे आवाहन देखील गहरवार यांनी केले.
रोगाशी लढा रोग्याशी नव्हे या उक्तीला साद घालत बजरंग दल ने उपचार झालेल्या महिलेपासून कुणालाही संक्रमणाचा धोका नसून आपण सर्वांनी त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी असे संतोष गहरवार यांनी यावेळी म्हटले.यावेळी रोशन बोकडे, अनिल हिवे,कन्हैया गहरवार,सत्यजित राठोड, गजानन इंगळे,अक्षय आवारे, गुंजन गादे, गोलू कोठार, , गुड्डू पोकळे, ओम कोठार,दीपक नागापुरे,जगदीश बंड, अभिजित टेटे, गोलू शेंदरकर, श्याम जोशी, प्रशांत इंगोले, गौरव राठोड, आदी बजरंग दल कार्यकर्ता उपस्थित होते.

अमरावती, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED