शिवमुद्रा ग्रुप चिमूर तर्फे भव्य गरबा महोत्सव साजरा

17

🔹तीन दिवस चालला महोत्सव

✒️सुयोग सुरेश (चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.5ऑक्टोबर):-शिवमुद्रा ग्रुप चिमूर तर्फे प्रेरणा कॉन्व्हेन्ट पटांगणात तीन दिवसीय गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ धनश्रीताई बिरर्जे प्रेरणा ग्रुप, प्रमुख अतिथी डा, सौ अश्विनीताई रोकडे, सौ नीतूताई पोहनकर, सौ, नम्रता ताई राचलवार, उपस्थित होत्या.

दिनांक 30 सप्टेमबर 2022 रोजी 7 ते 9 या वेळात सर्व वतोगठातील महिला व पुरुषांना गरभा खेळण्याची संधी शिवमुद्रा ग्रुप ने संधी दिली, रात्री 9 ते 11 या वेळेत 14 वर्षा खालील मुली व मुलांकरिता गरबाचे आयोजन करण्यात आले होते, दिनांक 1 आक्तोंबर 2022 रोजी 14 वर्षा वरील सर्वाना गरभा करण्याची संधी देण्यात आली होती, 2 आकतोंबरला समूह गरभा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शिवमुद्रा ग्रुप चिमूर तर्फे आयजित समूह गरबा स्पर्धेचे प्रथम बक्षीस एच डी बॉईज ग्रुप चिमूर यांना देण्यात आले, चौदा वर्षे खालील वयोगटतील प्रथम बक्षीस देवयानी पंचभाई, दुसरे बक्षीस संस्कृती भेंडे, तिसरे बक्षीस राधिका बनकर याना देण्यात आले, गरबा किंगचा प्रथम पुस्कार महेश बावणे, तर गरबा क्विन प्रथम पुरस्कार श्रुती बुडेकर यांना देण्यात आला, गरबा किंग दुसरा पुरस्कार कुणाल बिरिया व गरबा क्विंन गायत्री पाल याना देण्यात आला, समारोपीय गरबा स्पर्धेला चिमूर नगर परिषद मुख्याधीकारी डा, सुप्रिया राठोड यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला, स्पर्धा करीता चंद्रपूर नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे परीक्षण अंकिता पटेल, प्रा, विजय रुद्रकार, साहिल शेख तनुजा रूद्रकार यांनी तर संचालन शुभम लढा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शुभम सातपुते, निखिल डोईजळ, स्नेहल शंभरकर, आदित्य पिसे, हर्षल सहारे, बंटी शिंदे, महेंद्र झारकर, आदित्य कडू, गौरव पाटील व सर्व शिवमुद्रा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले,