चिमुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात श्रमदान

17

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.5ऑक्टोबर):- राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाकडून महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. कार्तिक पाटिल होतें.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रफुल बनसोड होतें. क्रार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. रहांगडाले तर सूत्रसंचालन प्रा. रोशन कुमरे यांनी केलें.

या कार्यक्रमास रासेयो विभागिय समन्वयक प्रा पिसे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, प्रा. डॉ. कामडी, प्रा. आशुतोष पोपटे, प्रा. गुणवंत वाघमारे, प्रा. मालके, प्रा. नरुले, प्रा.चटपकार उपस्थीत होते. रासेयो स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यानी श्रमदानातून प्लॅस्टिक निर्मुलन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ प्रफुल्ल बनसोड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल राजूरवाडे, प्रा. डॉ. नितिन कत्रोजवार यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयात श्रमदान व स्वच्छता केली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.