?66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीचा पुढाकार
✒️उमरखेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
उमरखेड(दि.5ऑक्टोंबर:-) सम्यक बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड उमरखेड येथे 66व्या धम्मचक्र परिवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी उत्सव सोहळा साजरा करत असताना सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंतेजी कीर्ती बोधी, हिराबाई दिवेकर (न.प माजी नगरसेविका), शंकरराव दिवेकर (माजी सैनिक) यांच्या हस्ते करण्यात आले.
या मंगलप्रसंगी औचित्य साधून 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समिती अध्यक्ष- योगेश दिवेकर, सचिव-कुमार केंद्रेकर, कोषाध्यक्ष- आकाश श्रवले, अमोल दिवेकर, आकाश पाईकराव, राहुल हटकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर यांनी पुढाकार घेऊन सिध्दार्थ दिवेकर यांचा निर्भीड, निस्वार्थी पत्रकार म्हणून व समाज कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सिध्दार्थ दिवेकर यांनी मागील पंधरा वर्षे पासून समाजसेवेचे सतत कार्य करीत आहेत. समाजाच्या कुठल्याही अडीअडचणीला धावून येतात.त्याच बरोबर एक निर्भीड, निस्वार्थी पत्रकार म्हणून सुद्धा त्याची तालुक्यात ओळख आहे.
चौकट- आज खऱ्या अर्थाने माझ्या समजा कार्याबद्दल व पत्रकारीता बद्दल आपण केलेला सत्कार हा ईतिहासिक आहे. – सिध्दार्थ दिवेकर
यावेळ अनेक बौद्ध उपासक उपासिका, तरुण मंडळी,बालक बालिका उपस्थित होते.