प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर

13

🔹अध्यक्षपदी विलास चव्हाण तर सचिवपदी बाबा खान यांची निवड

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.6ऑक्टोबर):-सर्वत्र महाराष्ट्रात गाजा वाजा असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेची उमरखेड तालुका कार्यकारिनी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

यावेळी काही सदस्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष भागवत काळे, युवा जिल्हाध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा सचिव सुनिल ठाकरे, युवा सरचिटणीसपदी विवेक जळके यांची निवड करण्यात आली. तर उमरखेड तालुका कार्यकारिणीमध्ये उमरखेड तालुका अध्यक्षपदी विलास चव्हाण, उपाध्यक्षपदी प्रेमकुमार भारती सचिव म्हणून बाबा खान यांची निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना भोपळे, हरीदास इगोंलकर, उमेश लकडे, अशोक गायकवाड, दिलीप हनवते, सविता घुगरे, मारोती गव्हाळे, मारोतराव रावते आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होतेयावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.