

✒️बाळासाहेब ढोले(पुसद तालुका प्रतिनिधी)
पुसद(दि.6ऑक्टोबर):-शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे काल दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, 14 ऑक्टोबर 1956 या पवित्र विजयादशमी दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त पीडित वंचित दलित बांधवांना बौद्ध धम्मची दीक्षा देऊन संपूर्ण जगामध्ये अविस्मरणीय अशी क्रांती केली.तोच ऐतिहासिक दिवस आज संपूर्ण भारतात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
त्याच अनुषंगाने पुसद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या ठिकाणी प्रज्ञापर्व समिती 2022 व समस्त् समाज बांधव यांच्या वतीने न.प पुसद चे मुख्यअधिकारी किरण सुकल्वड यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे संचलन करण्यात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती। पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, धम्मनायक सम्राट अशोक यांचा विजय असो*….अशा प्रकारच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
तसेच या ठिकाणी तथागत गौतम बुद्धयांच्या ध्यानस्थ मूर्ती समोर सामूहिक पद्धतीने त्रिशरण व् पंचशील घेण्यात आले.
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रज्ञापर्व समितीचे उपाध्यक्ष राजेश ढोले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचि माहिती विशद केली प्रथमता याच ठिकाणी प्रदीर्घ चालत असलेल्या उपोषना बाबत बोलताना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समोरील अतिक्रमण व सौंदर्यीकरण काढण्यासाठी आम्हाला उपोषण करावे लागते या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो आमच्या मागण्या लवकर पूर्ण करा,अनयथा प्रज्ञापर्व समिती व समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे समिती व समाज बांधवांच्या वतीने या वेळी प्रशासनाला सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक,व सूत्रसंचालन नरेंद्र पाटील सर यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून न. प्र. मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव कांबळे, प्रज्ञापर्व समिती, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, उपाध्यक्ष राजेश ढोले, कोषाध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रमोद धुळे ,बुद्धरत्न भालेराव, किशोर मुजमुले , रायबोले सर ,अमर सावळे, , संतोष जोगदंडे, उत्तम कांबळे,नितेश खंदारे, पत्रकार मारोती भस्मे,इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी महिला व बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.