

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.6ऑक्टोबर):-अखील भारतिय बौद्ध महासभा चिमूरच्या वतीने ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त चिमूर शहरातील पंचशिल चौक, नेहरू वार्ड, इंदिरा नगर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका पुढे पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन तथा सामुहीक त्रिसरण,पंचशिल ग्रहण करण्यात आले.
६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त अखील भारतिय बौद्ध महासभा चिमूरच्या वतीने पंचशिल ध्वजारोहन तथा सामुहिक वंदनेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचशिल चौकात ध्वजारोहन जितेंद्र सहारे यांचे हस्ते, नेहरू वार्डातील ध्वजारोहन दुर्योधन सोरदे यांचे हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका पुढील ध्वजारोहन अशोक जांभुळकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळेस सामुहिक त्रिसरण पंचशिल महेश पाटील यांचे कडून घेण्यात आले. मिठाई वाटुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळेस अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्रीदास राऊत, उपाध्यक्ष विलास इंदुरकर, आकाश भगत, सचिव प्रमोद अंबादे, सहसचिव दिनेश राऊत, सचिन इंदुरकर, कोषाध्यक्ष किशोर जांभुळकर इत्यादीसह सदस्य, त्रीसरण महिला मंडळाच्या पदाधिकारी आणी बौद्ध उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.