🔺पुरोगामी संदेशाचा बातमीचा परिणाम-कोरोनामुक्त महिलेची भेट घेऊन दिला दिलासा

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)

मो:-9545619905

अमरावती(दि.8जुलै): दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदगावपेठकडे धाव घेऊन काल रात्री त्या महिलेची भेट घेतली व तिला दिलासा दिला.

       विशेष म्हणजे पुरोगामी संदेश नेटवर्क मध्ये (दि:-6जुलै) रोजी “नांदगाव पेठ येथील कोरोनामुक्त महिलेचा कुटूंबावर अप्रत्यक्ष बहिष्कार ” या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती आणि शासन व प्रशासनाचा हालचाली वाढल्या होत्या,परिणामतः आज (दि-8 जुलै) रोजी महाराष्ट्राचा महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी कोरोना मुक्त महिलेची भेट घेऊन दिलासा दिला.

         यावेळी ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या, कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे. आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल तर सहवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आपल्याच एका भगिनीला वाळीत टाकण्याची भावना ठेवणे हाच मुळात एक मानसिक आजार आहे. त्यामुळे कुणीही बहिष्काराची मानसिकता बाळगू नये व कारवाई करायला भाग पाडू नये, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

            याबाबत ठोस उपाययोजनांसाठी आपण शासन स्तरावरही हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण यापूर्वी कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन रुग्णांची भेट घेतली आहे. आपण त्यादिवशी या भगिनीशी संवादही साधला होता. त्या खंबीर आहेत. कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची तब्येत ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे आता त्यांच्यात नाहीत. अशावेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वा

अमरावती, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED