अ.भा.अनिस युवा शाखा तर्फे डॉ. धनवटे यांचे स्वागत

18

✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.ऑक्टोबर):- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखा कारंजा तालुका कमिटीच्या वतीने डॉ.धनवटे यांचे स्वागत करण्यात आले.कारंजा येथील नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज व कनिष्ठ महविद्यालय येथील प्राचार्य डॉ. प्रा. संजय धनवटे यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति १९८२ पासून संपुर्ण भारतात अंधश्रध्देच्या निर्मूलनाच काम करत आहे.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ४० वर्षा पासून राष्ट्रीय संघटक प्रा.शाम मानव सरांच्या नेतृत्वात काम करत आहे.

कारंजा येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीची पुन्हा नव्याने तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्ष पदावर डॉ. प्रा. संजय धनवटे यांची नियुक्ती सर्वमताने करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढील वाटचाली व महाविद्यालयीन निवडणुका संदर्भात डॉ.प्रा संजय धनवटे व उपप्राचार्य उमेश मेश्राम यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका सहसंघटक पियूष रेवतकर, यीन मंत्रीमंडळाचे श्याडो कॅबिनेट मंत्री विश्र्वभूषण पाटिल, नितिन काशीकर, शाम अग्रवाल, युवा शाखेचे दिनेश डोंगरे ,भूषण फरकाडे उपस्थित होते.