

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)
कुरुल(दि.7ऑक्टोबर):-दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँकेचा शुभारंभ सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री . कल्याणराव काळे यांचे शुभ हस्ते व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री . प्रशांतराव परिचारक यांचे अध्यक्षतेखाली व धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा . शिवाजीराव काळुंगे, सौ . शोभाताई काळुंगे मॅडम, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा . चेअरमन मा. श्री . भगीरथ दादा भालके, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन मा. श्री .अभिजीत आबा पाटील, सु . रा .परिचारक पतसंस्था चेअरमन मा. श्री . प्रकाश तात्या पाटील या मान्यवरांच्या उपस्थिती मार्केट यार्ड पंढरपूर येथे संपन्न झाला .
यावेळी मा . आ . श्री . प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना नागेश फाटे हे तालुक्यातील उद्यमशील नेतृत्व असून त्यांची मानसिकताच उद्योग व्यवसायाची आहे निधी बँकेच्या माध्यमातून समाजाला आर्थिक मदत ते करतील आज ह्या संस्थेची सुरुवात लहान स्वरूपात झाली असेल तर सर्वांच्या सहकार्याने ही संस्था मोठी होईल व लहान शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना यातून मदत फाटे करतील अशी अपेक्षा बाळगून शुभेच्छा दिल्या . मा . श्री . कल्याणराव काळे यांनी बोलताना नागेश दादांना जी जबाबदारी दिली त्या संधीच सोन करण्याचं काम ते करतात हे त्यांचं काम मी जवळून अनुभवल आहे त्यांचे आजपर्यंतचे काम खूपच पारदर्शक आहे . कर्जदारांनी देखील ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले त्याच व्यवसायात तो पैसा लावून आपली पत निर्माण करावी असे सांगितले.
यावेळी प्रा . श्री . शिवाजीराव काळुंगे सर हे आपल्या भाषणातून नागेश फाटे हे समाजात हजारो माणसे कष्टकरी व्यापारी विश्वासू आहेत त्यांच्याकडे स्थावर नाही अशा लोकांना आपण आर्थिक सहकार्य करून समाजात स्थान निर्माण करून द्यावे व त्यांच्या जीवनात थोडसं सुख देऊन आर्थिक उन्नती साधण्याचं काम करावे व त्यांचे अश्रू आपण पुसण्याचे काम करावे असे अपेक्षा काळुंगे सरांनी व्यक्त केली . मी एका वेटरला चार कोटी रुपये दिले त्याच्यावर विश्वास टाकला आज ते दोन भाऊ रोजचा दीड लाखाचा टर्न ओव्हर करून रोजची ५० हजाराची बचत माझ्या बँकेत ते करीत आहेत असेच काम गरजूंच्या गरजा ओळखून श्री . नागेश फाटे करतील त्यांच्या संस्थेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य आपण करू असे आश्वासन दिले .
यावेळी श्री .प्रकाश तात्या पाटील, श्री . भगीरथ दादा भालके, श्री .अभिजीत पाटील यांनी या बँकेस सहकार्य करू असे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या .संस्थेचे चेअरमन श्री . नागेश फाटे यांनी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना तरुणांची व्यथा जाणली आहे त्यामुळे आपण निधी बँक ही संस्था आज शुभारंभ करत असून छोट्या मोठ्या उद्योगांना आपण आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सहकार्य करू असे आश्वासन दिले .
यावेळी दि .मर्चंट बँकेचे चेअरमन श्री . नागेश भोसले, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य श्री . सुरज रोंगे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह . सा .कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री राजेंद्र शिंदे ,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री समाधान काळे, सी . एस . सेक्रेटरी श्री प्रदीप रासनकर, पंढरपूर नगरपालिका विरोधी पक्ष नेते श्री .सुधीर धोत्रे , श्री .महादेव देठे, श्री .प्रकाश शेवाळे , श्री . राहुल जोशी , श्री .संतोष बाबर , श्री .तेजस गांधी , श्री .गणेश सूर्यवंशी , श्री . उद्धव बागल , श्री .बजरंग बागल , श्री .देवानंद गुंड , श्री .भास्कर कसगावडे , श्री . संदीप गाजरे , श्री .शहाजी साळुंखे , श्री .विष्णू यलमार , श्री .हनुमंत तरटे , श्री .अनिकेत देशपांडे , श्री .नितीन शेळके बँकेचे सर्व संचालक व विविध गावचे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते .