नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने रनमोचन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

14

🔸माजी जि. प. सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8ऑक्टोबर):-गावातील लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने तालुक्यातील रनमोचन येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जय लक्ष्मी शारदा महिला मंडळ रनमोचनच्या वतीने दसऱ्याच्या शुभपर्वावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव तथा दै. देशोन्नतीचे पत्रकार गोवर्धन दोनाडकर तर प्रमुख अतिथी म्हणून डाँ. गोकुलदास बालपांडे, शांताराम कावळे, उपसरपंच सदाशिव ठाकरे, डाँ. मयुर बालपांडे, दादाजी पिलारे अध्यक्ष तं.मु.स., घनश्याम मेश्राम ग्रा.पं. सदस्य, सौ. अस्विनी दोनाडकर ग्रा.पं. सदस्य, मंदाताई सहारे ग्रा.पं. सदस्य, अस्मिता पिलारे पोलीस पाटील, पांडुरंग प्रधान, प्रभू दोनाडकर, प्रकाश कुथे, आनंदराव राऊत, नामदेव सहारे व आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, ग्रामीण भागातच खऱ्या अर्थाने कलेचा उगम होतो. या लहानग्या मुलांमध्ये कलेचा जो बीज दडलेला आहे, त्या बीजाला रोपट बनविण्यासाठी अश्या कलेला प्रोत्साहन देण्याऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील युवक हा कलेच्या व बुद्धिमत्तेच्या भरोशावर जगात तरलेला आहे. कला असे मानवाशी भूषण, कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमामधे गावांतील बालगोपाल मंडळी यांनी अप्रतिम नृत्य सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विनोद दोनाडकर यांनी केले तर आभार गोलू ढोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय लक्ष्मी शारदा महिला मंडळ रनमोचनच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.