

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.9ऑक्टोंबर):- उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मा.तारुसिंह बयास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत धुमाळे ग्रा.प.सदस्य,एन. डी.पाटील कवी सुमेध घुगरे नरेंद्र पाटील लाभले होते, तर प्रमुख उपस्थितीत मा. नामदेव शिंगणकर (माजी संचालक कृ. उ.बाजार समिती उमरखेड,उत्तम पुंजाजी शिंगणकर, डी. बी. शिंगणकर (पत्रकार) गणेश शिंगणकर,भागोजी शिंगणकर, वैभव शिंगणकर, गजानन बी. शिंगणकर,दत्ता सयाजी शिंगणकर, विशाल भि. शिंगणकर, अमोल शिंगणकर, बी. जी. शिंगणकर तथागत यंग यूनियन मित्र मंडळ, सर्व बौद्ध उपासक उपासिका महिला मंडळ यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे मा.नरेंद्र पाटील आणि लक्ष्मीकांत धुमाळे यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन अर्हंत सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहार बांधकाम समितीचे अध्यक्ष कवी सुभाष शिंगणकर यांनी केले.
सूत्रसंचालन अविनाश शिंगणकर यांनी केले आभार डी. बी. शिंगणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतली.