चाकण येथील मेदनकरवाडी खुनाची पोलिसांनी केली उकल चाकण पोलिसांची दमदार कामगिरी

✒️राजगुरुनगर/पुणे प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरूनगर(दि.९आॕक्टोबर):- अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेचा दोरीने गळा खून करून मृतदेह निर्देशस्थळी पुरून नंतर बाहेर काढून अर्धवट जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दिनांक ६ रोजी उघडकीस आला. याबाबत चाकण पोलिसांनी मयत महिलेच्या पतीचा सासरा व दोन साथीदारांना अटक केली असून आशा गोरक्षनाथ देशमुख सध्या राहणार बोरजाई नगर मेदकरवाडी तालुका खेड मुळ राहणार श्रीगोंदा असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १/९/२०२२रोजी गोरक्ष बबन देशमुख वय ३५ वर्षे व्यवसाय -चपाती सप्लाय राहणार बोरजाई नगर मेदकरवाडी, तालुका खेड जिल्हा पुणे यांने चाकण पोलीस स्टेशन येथे खबर दिली की माझी पत्नी आशा गोरक्ष देशमुख वय ३० वर्षे ही दिनांक २९/०८/२०२२ रोजी रात्री ०२-००वाजले पासून बेपत्ता आहे. अशी खबर दिली सदर खबर वरून चाकण पोलीस स्टेशन मानव मिसिंग रजिस्टर नंबर २५/२०२२ प्रमाणे मिक्सिंग दाखल करण्यात आलेली होती.

सदर मानव मिसिंगची प्राथमिक चौकशी सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल सुरेश गोरडे करीत होते. दरम्यान अशा गोरक्ष देशमुख हिचा पती गोरक्ष देशमुख पोलीस स्टेशनला चौकशी दरम्यान वारंवार वेगवेगळी हकीकत सांगून दिशाभूल करीत होता. सदर मिसिंग महिला बाबत संशय बळवल्याने सदर मिसिंगची चौकशी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्याकडे देऊन सदर मिसिंग बाबत तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व तपास पथकास सकल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिले होते. दिनांक ६/१०/२०२२ रोजी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड साहेब पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस नाईक हनुमंत कांबळे पोलीस अमलदार प्रदीप राळे यांनी सदर मिसिंगचे खबर देण्यास बबन गोरक्ष बावन देशमुख ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली.

तसेच वारंवार घटनेची व घटनास्थळाची विसंगती माहिती देत असल्याचे गोरक्ष देशमुख यांच्यावर तपास पथकाचा अधिक संशय वाढवला. त्यामुळे त्याच्याकडे अधिक सकल विचारपूस केली असता त्याने त्याची पत्नी अशा हिचा बाहेर पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला ठार मारल्याचे ठरविले. त्याकरिता त्याने त्याच्या ओळखीचा रोशन गजानन भगत याच विश्वास घेऊन माझी बायको चुकीचे वागत असून तिला ठार मारण्यासाठी त्या बदल्यात एक लाख रुपये सुपारी देण्याचे ठरविले. राॕकी याने यासाठी चाकण येथील त्याचे साथीदार देवा व मुंडे असे दोन साथीदारांना सोबत घेऊन दिनांक २८ /२०२२रोजी सायंकाळी आळंदी घाटाचे जंगलामध्ये आदोगरच खड्डा घेऊन दिनांक २९/८/२०२२ रोजी रात्री दोन वाजता चे सुमारास पत्नी आशा हिचा राहात्या घरात दोरीने गळा आवळून तोंडावर उशी दाबुन ठेवून तिला ठार मारून तिचे प्रेत गोरक्ष व राॅकि यांनी गोरक्ष कडील स्कुटीवर ठेवून जाऊन आळंदी घाटात आधीच खणून ठेवलेल्या खड्यामध्ये पुरला आहे.

अशी धकाधक माहिती मिळाली. आरोपीने सांगितलेल्या हकीकत गंभीर स्वरूपी असल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी तात्काळ सदर प्रकार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर सहाय्य पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे त्यांना कळविला. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळावर आले व त्यांचे सूचना व मार्गदर्शकाखाली तपास सुरू केला. सदर तपासाअंती असे निष्पन्न झाले की संशयित आरोपी गोरक्षक देशमुख यांनी रोशन गजानन भगत व इतर साथीदार यास एक लाख रुपयांची सुपारी देऊन त्याचे बरोबर संगणमत करून नियोजनबद्ध कट करून दिनांक२९/८/२०२२ रोजी रात्री २ वाजता चे सुमारास त्याचे राहते घरात पत्नी आशा गोरक्ष देशमुख हिचा दोरीने गळा आवळून ठार मारून तिचे प्रेत चादरीमध्ये बांधून गोरक्ष देशमुख व रोशन भगत यांची स्कूटर वर ठेवून ते आळंदी घाटात नेऊन आधीच खोदुन ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पुरले. दरम्यान गोरक्षक देशमुख यास वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावल्यावर त्याच्यावर पोलिसांना संशय आल्याने लक्षात आल्याने गोरक्ष देशमुख यांनी त्याचे वडील बबन शिवलिंगे यांना गावावरून बोलावून घेतले व त्यांचे मदतीने सदरचे प्रत पुरलेल्या ठिकाणीच जाळायचे ठरविले दिनांक ०१/१०/२०२२रोजी गोरक्ष व वडील बबन यांनी आशा हिचे प्रेत उकरून त्यांच्यावर जंगलातील लाकडी टाकून जाळले.

परंतु सदरचे प्रेत अर्धवट जळाले म्हणून सदरचे अर्धवट जळालेले प्रेत एका पोत्यात भरले वडील बबन यांनी जवळच केळगाव हद्दीमध्ये असलेल्या डोंगरातील पाझर तलावात फेकून दिले दोन्ही आरोपीने सांगण्यावरून खड्ड्यातून मयत आशा हिचे प्रेताचे अर्धवट जळालेले अवशेष मिळाले असुन पाझर तलावातून अर्धवट जळालेले प्रेत पोलिसांना मिळाले आहे. सदर घटणे बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५८१/२०२२ भा.द.वी. कलम ३०२, २०१,१२०(ब),३४प्रमाने गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोरक्षक देशमुख यांनी सोबतचे सुपारी घेतलेल्या इतर आरोपी हे पुन्हा केल्यानंतर पैसे घेऊन पळून गेले होते तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व पथकाने आरोपी रोशन गजानन भगत यास चाकण परिसरातून तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व पथकाने देवानंद गजानन मनवर यास मसवड सातारा येथे जाऊन सापळा रचून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात आरोपी नामे १)गोरक्ष बबन देशमुख ३५ वर्ष राहणार मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, २)रोशन गजानन भगत उर्फ राॕकी वय २०वर्षे राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार रुई तालुका मानोरा जिल्हा वाशिम ३)देवानंद गजानन मनवर वय २४वर्षे राहणार वाडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम ४)बबन शिवलिंग देशमुख वय ६२वर्षे राहणार पडेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांना अटक करण्यात आलेली असून सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवडे (गुन्हे) हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे. पोलीस उपआयुक्त परिमंडळ -१ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश शिंदे पोलीस हवालदार राजू जाधव संदीप सोनवणे पोलीस नाईक हनुमंत कांबळे निखिल शेटे सुदर्शन बर्डे भैरोबा यादव, महिला पो.ना. भाग्यश्री जमदाडे पोलीस कॉन्स्टेबल नितीन गुंजाळ निखिल वर्पे अशोक दिवटे प्रदीप राळे सुनील भागवत चेतन गायकर यांनी केलेले आहे. *माननिय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी*

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED