पुरोगामी संघटनेकडून स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट

19

🔹पुरोगामी म्हणजे विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना – श्रीनिवास कांबळे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10ऑक्टोबर):- महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे ञैवार्षिक अधिवेशन व सत्कार सोहळा शिवसाई मंदिर, माउंट काॕन्व्हेंट रोड, गोपाल नगर, चंद्रपूर येथे उदघाटक निवास कांबळे गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर व किशोर आनंदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले . यावेळी संघटनेच्या वतीने नारायण कांबळे जिल्हा नेता व मन्साराम आञाम विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचा मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

संघटनात्मक दिशा देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून विजय भोगेकर राज्यनेते, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस, संजय चिडे, जिल्हा सरचिटणीस, निखील तांबोळी,दिपकभाऊ वर्हेकर, जिल्हा सल्लागार, शालिनी खटी महिला मंच अध्यक्ष,पोर्णिमा मेहरकुरे, सरचिटणीस व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती.

पुरोगामी संघटनेच्या सामाजिक परंपरेला अनुसरून गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना पुरोगामी समितीच्या वतीने नवोदय परीक्षा व स्काॕलरशीप परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शिका व चेस बोर्ड भेट देण्यात आले. त्याप्रसंगी पुरोगामी ही विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना असून न्याय हक्कासाठी भांडता भांडता सामाजिक मूल्य जोपासत असल्याचे मत निवास कांबळे यांनी व्यक्त केले .

त्रैवार्षिक अधिवेशन व सत्कार सोहळ्यानंतर जिल्हा कार्यकारीणीद्वारा २०२२-२५ करिता नुतन कार्यकारीनीचे गठण करण्यात आले. तालुका नेते देवेंद्र गिरडकर,अध्यक्ष गणेश कागदेलवार, सरचिटणीस प्रकाश झाडे, कार्याध्यक्ष शाम पाचघरे, कोषाध्यक्ष संतोष शुक्ला यांची एकमताने निवड करण्यात आली .महिला मंच कार्यकारिणीत अध्यक्ष सुरेखा वांढरे, सरचिटणीस मंजुषा फुलझेले, कार्याध्यक्ष वंदना वाटेकर, कोषाध्यक्ष मदनकर यांची एकमताने निवड करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन प्रकाश झाडे, प्रास्ताविक प्रतिभा उदापुरे तर आभार प्रशांत कावळे यांनी मानले .