

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.10ऑक्टोबर):- स्थानीक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, लैगिंक छळ प्रतिबंधक समिती, व आजीवन विस्तार सेवा केंद्र विभागाच्या वतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचें अध्यक्ष महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य लेंप्टनट डॉ प्रफुल्ल बन्सोड होते. अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,प्रत्येकानी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असले पाहिजे. तसेच चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या बाबीची नित्यनियमाने अमंलबजावणी केली पाहीजे.या प्रसंगी मार्गदर्शन करताना आहारतज डॉ. वाघमारे यांनी सांगितले की किशोर वयीन मुलीनी समतोल आहार घेतला पाहिजे महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच देशाचे आरोग्य योग्य राहील.
या कार्यकमाचे आयोजन सार्वजनिक आरोग्य उपजिल्हा रुग्णालय व रेड रिबन क्लब चिमूर यांच्या संयुक्त प्रयत्नाने करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात समुपदेशक कामिनी हलमारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ महाबळे, डॉ. सौ. अश्विनी पिसे, सिस्टर कु पुनम कांबळे, कु हरामे यांनी महाविद्यालयातील कुमारवयीन विद्यार्थ्यानीची हिमोग्लोबीन, सिकलसेल चाचणी, रक्तगट तपासणी,वजन उंची व बाँडी इंडेक्स मोजमाप केले. व इतर आजारा संदर्भात समुपदेशन केले. या कार्यकमाला मराठी विभागप्रमुख प्रा कार्तिक पाटील, प्रा० डॉ.हरेश गजभिये प्रा.आशुतोष पोपटे, गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा० शितल वानखेडे इंग्रजी विभागाच्या प्रा० वर्षा सोनटक्के, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रफुल राजुरवाडे उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नितिन कत्रोजवार प्रास्ताविक प्रा. पी व्ही पिसे तर आभार प्रा डॉ. लक्ष्मण कामडी यांनी केले