उमरखेड आगारातून उमरखेड ते पुणे या रातराणी लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू

17

🔹आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांच्या हस्ते शुभारंभ

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10ऑक्टोबर):-उमरखेड आगारातून उमरखेड ते पुणे या रातराणी लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांच्या हस्ते शुभारंभ करून प्रारंभ करण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग अंतर्गत असलेल्या उमरखेड आगारातून उमरखेड ते पुणे ही लांब पल्ल्याची बस सेवा सुरू होती. तरी सदर बस सेवा ही काही कालावधीपासून काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती.

तरी सदरची बस सेवा रद्द झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असे. याबाबत बस सुरू होण्याबाबत वारंवार मागणी प्रवाशांकडून होत होती परंतु महामंडळाकडे नवीन बससेवेची उपलब्धता नसल्याकारणाने विलंब होत होता.

दरम्यान महामंडळाच्या या धोरणामुळे प्रवाशांना प्रतिसाद लाभत नसल्याने अखेर उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने तथा औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था यांनी संयुक्तरीत्या प्रवासाची मागणी लक्षात घेता उमरखेड ते पुणे व उमरखेड ते कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या रात्रराणी बस सेवा उमरखेड आगारातून सुरू करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळ महाव्यवस्थापक मुंबई व आगार व्यवस्थापक उमरखेड यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

आमदार नामदेव ससाणे व औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीची दखल घेत उमरखेड ते पुणे या लांब पल्ल्याच्या बससेवेचा आज शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान सदर बस सेवा ही उमरखेड येथून वेळ 03. 45 वाजता सुटून पुणे येथे सकाळी 5.00 वाजता पोहोचेल तर पुणे येथून उमरखेड निघण्याची वेळ दुपारी तीन 03.45 ला असेल तरी याकरिता प्रवाशांना प्रवास भाडे म्हणून 835 रुपये प्रवास भाडे लागतील तसेच प्रवाशांनी एसटी बसनेच प्रवास करून महामंडळास सहकार्य करावे.

असे आव्हान आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी केले.
यावेळी आगाराचे वर्कशॉप प्रमुख प्रकाश भदाडे, पत्रकार वसंत देशमुख,आशिष राठोड,पत्रकार रवी भोयर, शैलेश ताजवे, एसटी कर्मचारी विजय वानखेडे, शरद टोमके, अविनाश जाधव, भारत वाटोळे, गोविंद चनेबोईनवाड, सौ पाटील मॅडम, दत्ता उगले, सुरेश मोरे आदी कर्मचारी येथील नागरिक व प्रवासी प्रामुख्याने उपस्थित होते.