

🔹शहरात निघाला भव्य दिव्य जुलूस रॅली
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.10ऑक्टोंबर):-उमरखेड शहरात ईद ए मिलाद उर्फ मोहम्मद पैगंबर(स.) जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी दरवर्षी निघणारा जुलूस यावेळेस हजारोच्या उपस्थित आठवडी बाजार येथे तातार शाह बाबा दर्गाह परिसरातून निघाला. जुलूस असंख्य लोकांची उपस्थित होती.सकाळी 9 वाजता हजरत तातार शाह बाबा यांच्या दर्गावर सिरत कमिटी तर्फे फुलांची मानाची चादर अर्पित करून फतेहा देऊन जुलूस आरंभ करण्यात आले.
जुलूस मार्गक्रम होत असतांना अनेक सामाजिक संघटनानी पाणी, खिचडी, बिस्कीट चे वाटप केले. जुलूस शांततेत पार पडले असून पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.ईद मिलादुन्नबी कमिटी चे अध्यक्ष अब्दुल समद,शेख जाकीर राज ,सय्यद अफसर ,शेख तालीब अहमद ,सय्यद तहेजीर ,आसिफ अहमद, शेख इलियास राज ,मोहम्मद सोहेल मुजावर, फिरोज खान लाला ,मोहम्मद युसुफ आदिने परिश्रम घेतले.
चौकट :- तांबोळी पुऱ्यात घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
उमरखेड च्या प्रसिद्ध शिव मंदिरासमोरून जुलूस जात असतो. यावेळी उपस्थित हिंदू बांधवानी जुलूस मध्ये उपस्थिताना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या.
तसेच मुस्लिम बांधवांनी मंदिरासमोर डीजे बंद केले उमरखेड शहरात हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम रहावे या साठी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना नेहमी पुढाकार घेत असतात.
चौकट :- पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे जुलूस बघण्यासाठी येणाऱ्या इतर गावातील अनेक युवकांचा झाला हिरमोड
उमरखेड शहरातील जुलूस हा यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध असून जुलूस बघण्यासाठी अनेक युवक या दिवसाची आतुरतेने वाट बघतात.
जुलूस च्या दिवशी चुरमुरा फाट्यावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी मुळे जुलूस बघण्यासाठी येणाऱ्यांना वापस पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनानी कोणत्या कायद्या अंतर्गत युवकांना उमरखेड शहरात येण्यास मज्जाव केला? हे अद्याप गुलदसत्यातच आहे.