गणेश कागदेलवार यांची चंद्रपूर पुरोगामीच्या अध्यक्षपदी निवड

40

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11ऑक्टोबर):- महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती शाखा चंद्रपूर चे ञैवार्षिक अधिवेशन व सत्कार सोहळा आणि नवीन कार्यकारिणीची निवड शिवसाई मंदिर,माउंट काॕन्व्हेंट रोड,गोपाल नगर,चंद्रपूर येथे उदघाटक निवास कांबळे गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर व किशोर आनंदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले . यावेळी संघटनेच्या वतीने नारायण कांबळे ,जिल्हा नेता व मन्साराम आञाम ,विस्तार अधिकारी (शिक्षण) यांचा मानवस्त्र , सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी नव्याने निवड करण्यात आलेल्या चंद्रपूर पुरोगामी शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कागदेलवार यांची एकमताने निवड करून अभिनंदन करण्यात आले .

संघटनात्मक दिशा देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून विजय भोगेकर राज्यनेते ,हरिश ससनकर राज्य सरचिटणीस ,संजय चिडे ,जिल्हा सरचिटणीस,निखील तांबोळी  दिपकभाऊ वर्हेकर सर ,जिल्हा सल्लागार ,शालिनी खटी महिला मंच अध्यक्ष, पोर्णिमा मेहरकुरे , सरचिटणीस व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती .पुरोगामी संघटनेच्या सामाजिक परंपरेला अनुसरून गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना पुरोगामी समितीच्या वतीने नवोदय परीक्षा व स्काॕलरशीप परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शिका व चेस बोर्ड भेट देण्यात आले. त्याप्रसंगी पुरोगामी ही विद्यार्थी हितासाठी झटणारी संघटना असून न्याय हक्कासाठी भांडता भांडता सामाजिक मूल्य जोपासत असल्याचे मत निवास कांबळे यांनी व्यक्त केले .

जिल्हा कार्यकारीणीद्वारा २०२२-२५ करिता चंद्रपूर शाखेच्या नुतन कार्यकारीनीत तालुका नेते देवेंद्र गिरडकर ,अध्यक्ष गणेश कागदेलवार ,सरचिटणीस प्रकाश झाडे ,कार्याध्यक्ष शाम पाचघरे ,कोषाध्यक्ष संतोष शुक्ला यांची एकमताने निवड करण्यात आली . महिला मंच कार्यकारिणीत अध्यक्ष सुरेखा वांढरे सरचिटणीस मंजुषा फुलझेले कार्याध्यक्ष वंदना वाटेकर कोषाध्यक्ष निर्मला मदनकर यांची एकमताने निवड करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन प्रकाश झाडे , प्रास्ताविक प्रतिभा उदापुरे तर आभार प्रशांत कावळे यांनी मानले .अधिवेशनकरिता चंद्रपूर पुरोगामी शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले .