व्हर्च्युअल क्लास च्या माध्यमातून शिक्षण

  53

  देश स्वातंत्र्यानंतर आपण शिक्षणाचा प्रसार व प्रचार त्या बाबतीत समाधानकारक प्रगती केली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात शिक्षणातून गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचे फळ फलित म्हणून सर्वत्र गुण मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली. परीक्षेतील गुण म्हणजेच गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले. त्याचा परिणाम म्हणून पुढील गोष्टी जाणू लागल्या.
  विशिष्ट ठिकाणी आणि शहरांमध्ये बंद झालेली शिक्षण, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. डिजिटल त्यांचा दृष्टीत शिक्षण( व्हर्च्युअल एज्युकेशन) हेच त्याला उत्तर आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून दृश्य माध्यमाच्या साह्याने सहजपणे तज्ञ ,अनुभवी ,व्यासंगी ,प्रभावी व्यक्ती द्वारे सर्वसमावेशक व परिणामकारक शिक्षण देणे शक्य होईल. समाजात शिक्षणा मधून अघोरी स्पर्धा सुरू झाली. विशिष्ट अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या. वरील स्पर्धेत यश मिळवण्यासाठी खाजगी शिकवणी वर्ग वाढले आहे. या खाजगी शिकवणी वर्गाची मनमानी फी गगनाला भेटली आहे. यामुळे गरीब व शेतकरी कुटुंबातली विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे मागे पडू लागला आहे. हे निकोप समाजाच्या समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही. गरीब कुटुंबांमध्ये आणि ग्रामीण भागात जन्माला येणे म्हणजे शिक्षणाच्या संधी वर पाणी सोन्यासारखी आहे. तशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.
  आजचे युग हे जागतिकीकरणाचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झालेली वाढ व प्रगती हे प्रमुख अंग आहे. अवघे जग बदलून टाकण्याची ताकद माहिती तंत्रज्ञानात आहे. स्मार्टफोन, टॅब ,लॅपटॉप, यूट्यूब चैनल ,मेमरी कार्ड, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, विकिपीडिया, आणि व्हर्च्युअल क्लास हे शब्द तरुणाईला शालेय विद्यार्थ्यांना नवीन नाहीत. ही एक प्रकारची शैक्षणिक क्रांतीच आहे.
  ” व्हर्च्युअल शिक्षणामध्ये” माध्यम निहाय व विषय निहाय व परीक्षेच्या स्वरूपानुसार तज्ञ ,अनुभवी शिक्षक पूर्ण नियोजन वेळापत्रकानुसार स्टुडिओ मधून व्याख्यान देतात. स्टुडिओमध्ये फाईट बोर्ड स्मार्ट बोर्ड माय व्यवस्था असते तसेच दोन प्रकारचे कॅमेरे केंद्रस्थानी असून त्यातील एक कॅमेरा शिकवणाऱ्या शिक्षकावर केंद्रित केलेला असतो. विद्यार्थी ज्या केंद्रावर किंवा व्हर्च्युअल क्लास वर शिक्षण घेत आहे किंवा शिकत आहे किंवा शिकणार आहे तेथे कॅमेरा एलसीडी प्रोजेक्टर वर व स्क्रीन हे साहित्य असते स्टुडिओ मधून विद्यार्थी स्टुडिओ मधील शिक्षकांची संवाद साधतात. प्रश्न विचारतात स्टुडिओ मधील शिक्षकांशी प्रश्नाचे उत्तर देतात यालाच आपण (आंतरक्रिया इंटरॅक्टिव्ह )असे म्हणतात. व्हर्च्युअल शिक्षणात आभासी वातावरण निर्मिती महत्त्वाची असते . व्हर्च्युअल शिक्षण हे अधिक सखोल दूरगामी आणि सर्वसमावेशक आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत आपण ते वापरू शकतो.

                               गजानन गोपेवाड(मो:-7378670283)
                              राज्य समन्वयक
                 अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य