राष्ट्रीय जंतनाशक मोहिमे अंतर्गत भगवतीदेवी विद्यालयात जंतनाशक गोळीचे वाटप

44

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11ऑक्टोंबर):- तालुक्यातील भगवती देवी विद्यालय, देवसरी येथे डॉ. ज्ञानेश्वर बागल व सौ. करूना गिरी (आशा स्वयंसेविका) यांच्या शुभहस्ते विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दुपारी 1:30मी जंतनाशक मोहिमे अंतर्गत जंत नाशक गोळीचे वाटप करण्यात आले.

व गोळीचे महत्त्व डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना सांगितले त्यामुळे विद्यार्थी गोळी खाण्यासाठी प्रेरित झाले. त्यामध्ये वयोगट 1 ते 19 पाच ते दहा पर्यंत मुलं 127 मुली 136 एकूण 263 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळेस विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश वानरे दिगंबर माने शेख सर गणेशराव शिंदे अनिल अल्लडवार भागवत कबले सौ. मीना कदम अरविंद चेपुरवार भागवत जाधव यांची आवर्जून उपस्थिती होती.

डॉ. बागल हे विद्यालयाच्या नेहमी संपर्कात असतात हे विशेष म्हणावे लागेल.