पोलिस बांधवाना दिपावलीचा बोनस तात्काळ द्या : खुपसे-पाटील

18

🔹अन्यथा मंत्रालयासमोर खर्डा भाकर खाऊन आंदोलन करणार

🔸 ‘जनशक्ती’ संघटनेने दिला इशारा

✒️कुरूल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.12ऑक्टोबर):-सण कोणताही असो, पोलीस बांधवांना तो साजरा करता येतच नाही. घरदार कुटुंब सोडून तो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. आमदार-खासदार मंत्र्यांचे दौरे, वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे मोर्चे आंदोलन, वेगवेगळ्या मिरवणुका, वेगवेगळ्या जयंत्या या सर्व बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस बांधवावर असते. त्यामुळे सण आहे काय आणि नाही काय..? त्यांना कसलाच फरक पडत नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसात घरोघरी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करणाऱ्या महिला दिसतात. मात्र आमच्या पोलीस भगिनी एकाच रंगाची साडी घालून आपली सेवा बजावत असते अशा परिस्थितीत सरकारने शासकीय सेवेतील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला, मात्र पोलिस बांधवांना यापासून वंचित ठेवले. त्यामुळे राज्यातील सर्व पोलिसांना एक महिन्याचा पगार म्हणून बोनस द्यावा अशा मागणीचे निवेदन जनशक्ती संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना दिली असून बोनस न दिल्यास २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर खर्डा भाकर खाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पोलीस दलातील ग्रामीण भागातील पोलिसांच्या घरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पडक्या आणि घरच्या घरात पोलीस बंधू आपले दिवस काढत आहेत. शासकीय कामानिमित्त अथवा आरोपीच्या शोधासाठी अथवा चौकशीसाठी पोलिसांना पदर खर्चाने जावे लागते. त्यासाठी शासनाने प्रवास भत्ता दिला पाहिजे. पोलिसांच्या कामकाजात नेहमीच राजकीय हस्तक्षेप केला जातो तो थांबला पाहिजे. पोलीस असून ती जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व आजारांवर मोफत उपचार व्हावा म्हणून अद्ययावत रुग्णालय उभा केले पाहिजे. यासह पोलिसांना उद्याच्या दिवाळीच एक महिन्याचा पगार म्हणून दिवाळी बोनस दिला पाहिजे ही प्रमुख मागणी या निवेदनात केली आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर खर्डा भाकर आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील यांनी दिला.