जिवा सेना व विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने जिवाजींना अभिवादन…

21

🔹जिवाजींच्या चरित्रातून जगण्याची प्रेरणा घ्या — लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.12ऑक्टोबर):– येथील गुजराथी गल्ली परिसरात अ.भा. जिवा सेना व स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवरत्न जिवाजी महालेंच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरत्न जिवाजी महालेंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गावातील व परिसरातील युवकांनी या जिवाजींच्या चरित्रातून जगण्याची प्रेरणा घ्या. योग्य संगत धरा, आई वडिलांची सेवा करा, व्यसनांच्या पासून दूर राहून आरोग्य सांभाळा, आत्महत्येचा विचार चुकुनही मनात आणू नका असा सल्ला लक्ष्मणराव पाटील यांनी दिला. याप्रसंगी जगद्गुरू तुकोबाराय, संतश्रेष्ठ सेना महाराज, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, जिवाजी महाले, शिवा काशिद या सर्व महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला. मान्यवरांच्या व जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते शिवराय व जिवाजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला क्राईम ब्रांच जळगांव चे योगेश वऱ्हाडे, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष, सुनिल पंढरीनाथ चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, शिवजयंती उत्सव समितीचे जितू महाराज, मराठा नाभिक समाज अध्यक्ष अशोक झुंजारराव, कैलास झुंजारराव, गणेश झुंजारराव, ज्ञानेश्वर झुंजारराव, जिवा सेना तालुका अध्यक्ष रविंद्र निकम, जिवा सेना शहराध्यक्ष अमोल महाले, जगन्नाथ फुलपगार, सोपान वारुळे, सचिन झुंझारराव, पप्पू महाले, सोनू झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, किरण बिरारी, विक्की निकम सुरज एसी, विकास बिराडे, कमलेश बोरसे, विनोद फुलपगार, भुषण वारुळे, शुभम सोनवणे, विजय निकम, अमोल निकम, कृष्णा झुंजारराव, गौरव झुंजारराव, गुरुनाथ गायकवाड, भाजपचे सचिन पाटील, शशिकांत गुजराती, पप्पू पाटील, रोहित पाटील, सोनू पाटील, तुषार पाटील, इंद्रजीत झुंजारराव, राजू इंगळे, दुष्यंत अहिरे, कैलास पाटील यांच्यासह सर्व समाज उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अ.भा. जिवा सेना व स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.