भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी च्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी कवी स्वप्निल गोरे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड

17

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12ऑक्टोबर): -पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या छोट्याशा खेडेगावातील मा. स्वप्निल मनोहर गोरे यांची काही दिवसांपूर्वीच भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी च्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. स्वप्निल गोरे डोळ्याने 75 टक्के अपंग आहेत व सध्या फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे बीए तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहेत. बीए प्रथम वर्षाला असतानाच त्यांना कविता लिहिण्याचा छंद लागला होता व काही वृत्तपत्राद्वारे ते आपल्या कविता प्रकाशित करत होते.

त्यांची साहित्य क्षेत्रातली आवड बघून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीचे अध्यक्ष मा. विशाल शिरसाट सर व तसेच उपाध्यक्ष मा.विजय जायभाये सर यांनी स्वप्निल गोरे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. स्वप्निल गोरे यांच्या नियुक्तीचे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आणि विशेषतः पुसद तालुक्यामध्ये त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या साहित्य क्षेत्रात रस निर्माण करण्यामागे सर्व शिक्षक व तसेच त्यांचे मोठे बंधू शिवाजी गोरे यांचे महत्त्वाचे योगदान आहे असे त्यांनी सांगितले.