गंगावाडी परिसरात भूसंपादन आधिकारि व शेतक-यांच्या संगणमताने शासनाची दिशाभुल ! – भास्कर हातागळे

15

🔹तक्रारकर्त्याच्या निवेदनाकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आसल्याने तक्रारकर्त्याने दिले स्मरणपत्र

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.12ऑक्टोबर):-भूसंपादन लघुपाठबंधारे ऊप विभागीय कार्यलय अंबड, जि. जालना व मा. उपअधिक्षक साहेब, भूमिअभिलेख कार्यालय गेवराई. ता. गेवराई जि. बीड.
यांना गंगावाडीचे सरपंच भास्कर हातागळे यांनी दिं.६=७=२०२२ एक रोजी लेखी तक्रार दिली होती. ती या प्रमाणे. मौजे गंगावडी पो . तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कार्यालया अंतर्गत होत असलेल्या चुकीच्या भूसंपादन बाबत. उपरोक्त विषय कळवण्यात येते की, मोजे गंगावाडी येथे मंगरूळ उच्च पातळी बंधारे अंतर्गत होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत काही अधिकारी व शेतकरी यांच्या संगणमताने बंधाऱ्याचे पाणी शेतामध्ये जात नसताना, तरीपण पाणी जात असल्याचे दर्शवुन भूसंपादन प्रक्रिया करण्याच्या तयारीत आहेत.

यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास शासनाची फसवणुक होऊन या भुर्दनापोटी आर्थिक नुकसान होईल तरी मे. साहेबांनी वरील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन होत असलेले भूसंपादन रद्द करून सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शेतकरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसे न केल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल. आसे संबंधित निवेदन कर्त्याने संबधित कार्यालयास कळविले आहे.

वरील संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, मौजे गंगावाडी पो. तलवाडा ता. गेवराई जि. बीड यांच्या मार्फत आपल्या कार्यालयात दिनांक ०६/०७/२०२२ रोजी भू – संपादन विषय आक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु अध्याप पर्यंत सदर अर्जावर कसल्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे लेखी अथवा तोंडी आमच्या कार्यालयास कळविण्यात आलेले नाही. तरी आपणास या समरण पत्राद्वारे कळवण्यात येते की, सदर अर्जावर कोणत्या प्रकारे कारवाई केली याची लेखी स्वरूपात माहिती कळवण्यात यावी करीता हे स्मरणपत्र. सोबत दिनांक ०६/०७/२०२२ रोजीचे ग्रा.प. यांच्या आक्षेप अर्जाची प्रत. सोवत, मा. उपविभागीय अधिकारी साहेब ( भू – संपादन ) लघुपाठबंधारे उपविभाग अंबड. जि. जालना. यांना दिलेल्या आक्षेप अर्जाची झेरॉक्स जोडुन संबंधित कार्यालयास दिली आसल्याचे गंगावाडीच्या सरपंचांनी म्हण्टले आहे.