आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा हॉस्पिटलला एक कॉल जाताच एक लाख सदोतीस हजार वाचले

30

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.13ऑक्टोबर):-हडपसर मधील बबन तात्याबा साबळे हे इनामदार हाॅस्पीटल मध्ये मुतखड्याच्या इन्फेक्शन मुळे ॲडमीट होते.परतु उपचार चालू असताना १० तारखेला सकाळी दुःखद निधन झाले.परतु दवाखान्याचे बील ३५००००लाख रुपये झाले.साबळे कुटुंबियांनी १९१००० रुपये भरले परंतु पुर्ण रक्कम भरल्याशिवाय बाॅडी मिळणार नाही.असे सांगण्यात आले.त्यावेळी आईला ही ॲटक आला आता काय करायचं असा प्रश्व मुलांसमोर पडला..

त्यांना फेसबुक व युटुब मधुन अतुल भाऊ खुपसे यांच्या नंबर मिळवला व काॅल करुन सर्व हाकिकत सांगितले व अतुल भाऊ संवेदनशील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मेसेज करुन इनामदार हाॅस्पीटल गरीब साबळे कुटुंबातील उपचार चालू असताना मयत झाली आहे.परतु पैसे भरल्याशिवाय बाॅडी देणार नाहीत. परंतु साबळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.

सवेंदशिल आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची ओळख तयार झाली असे मंत्रिमंडळ मधील सर्व मंत्री असतील तर समाजात गरीब माणसाला आणि शेतकऱ्याला खूप मदत होईल.सध्या मंत्रीमंडळात नंबर वन मंत्री आहेत.कारण तळागाळातील जनतेपर्यत जाऊन त्यांना मदतीचा हात देणारे व डॉशिंग,अभ्यासु मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री जबाबदारी पडताच
राज्यातील शासकीय रूग्णालय तसेच खासगी रूग्णालयातील सुविधा, मोठ्या प्रमाणात आकारली जाणारे बिल याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्वाचा विचार करूनच राज्यातील सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सदर पथक येथे अचानक भेट देवून तपासणी करणार आहे.

त्यावेळीस कर्तव्यदक्ष तानाजी सावंत यांनी एक कॉल केला आणि साबळे यांची बाॅडी देण्यात आली. संवेदनशील आरोग्य तानाजी सावंत व अतुल भाऊ खुपसे यांच्या प्रयत्नातून साबळे कुटुंबाचे १३७००० हजार रुपयांचे बिल माफ झाले.

साबळे यांनी अतुल भाऊ खुपसे यांना फोन करुन आभार मानले व त्यावेळी अतुल भाऊ म्हणाले की आमच्या जन्म गरिबांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मदत करण्यासाठी झाला आहे.