

इंग्रजांच्या अमदानीत सरकारी नोकर म्हणजेच सरकार मानला जात होता.साधा पोलिस, कारकून पाहून माणसे पळ काढत.दहशत होती.पोलिस , कारकून ची नाही, सरकारची.भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही दहशत कमी केली.कारण सरकार आपले लोकांचे आहे.गांधी नेहरूंचे आहे.पटेल शास्रीजींचे आहे.म्हणून नागरिकांचे अधिकार वाढवले.राज्यघटनेत नमूद केले.नोकरांचे अधिकार कमी केलेत.नोकर म्हणजे सेवक असा शब्दप्रयोग सुरू झाला.मग तो केंद्रिय लोकसेवा आयोगाचा कलेक्टर असो कि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा फौजदार असो.पण सेवकच.
१९७५मधे प्रधानमंत्री इंदिरा गांधी निवडणूक प्रकरणात अडचणीत सापडल्या.कोर्टाने त्यांचे खासदार पद रद्द केले.परिणामी प्रधानमंत्री पद सुद्धा आपोआप रद्द झाले.पण इंदिरा गांधींनी पद सोडले नाही.विरोधक बोंबा मारू लागले.आंदोलन करू लागले .त्यापासून बचाव करण्यासाठी इंदिरा गांधींनी आणिबाणी लादली.विरोधात बोलतो.टाक जेलमध्ये.भारतातील जेल पुन्हा तुडुंब भरल्या.कैदींना जेल म्हणजे गाव,शहर वाटू लागल्या.इतकी गर्दी झाली.तरीही आंदोलने थांबली नाहीत.पुर्ण भारत तर जेलमध्ये टाकता येणार नाही.तेंव्हा भीती होती कि,आता आता स्वातंत्र्य मिळाले.आणि ही आणिबाणी.नव्हे हुकूमशाहीच.स्वातंत्र्य युद्ध खेळलेले सैनिक जिवंत होते.जेलचा त्यांना सराव झाला होता.आत बाहेर सारखेच समजत असत.
तिकडे पाकिस्तानात प्रधानमंत्री झुल्फिकार भुट्टोंना फासी झाली.ते इंदिरा गांधींचे क्लासमेट होते.इकडे इंदिराजी हादरल्या.अरे बापरे!असे पण होऊ शकते.त्यांनी दोन पाऊले मागे टाकली.आणिबाणी मागे घेतली. निवडणूक जाहीर केली.जेलमधील विरोधक निवडून आले.सत्ता उलटीपालटी झाली.इंदिरा गांधींनी चूक मान्य केली.जनतेची माफी मागितली.कांग्रेसचे मोरारजी देसाई प्रधानमंत्री बनले.त्यांनी इंदिरा गांधींचा सूड घेण्यास मनाई केली.तरीही कोर्टाने , तीन दिवस तिहार मधे टाकल्याने जनमत पुन्हा इंदिरा गांधींच्या बाजूने झाले.१९८०मधे पंजा चिन्हावर लोकांनी भरभरून मतदान केले.
भारतीय जनता गरीबी सहन करते.पण हुकूमशाही सहन करीत नाहीत.याचा अनुभव आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सुद्धा आहेच.पण विसरले असतील कदाचित.दिर्घकाळ सत्तेवर असल्याने मागील जखमांचा विसर पडतो.पण भारतीय जनमाणसाच्या स्वभावाचा विसर पडू नये.
राममंदिर, काश्मीर,सीएए .चांगला निर्णय घेतला.यात जनता खुष झाली.या संधीचा फायदा घेत जनतेचे आर्थिक शोषण सुरू केले.फालतू कारणे लोकांच्या खिशातून पैसे चोरण्याचा उद्योग सुरू केला.जीएसएसटी चा जिझीया कर, ऑनलाईन चे लफडे,नोटबंदीचे गौडबंगाल. यामुळे जनता परेशान झाली.आपलाच पैसा आणि आपणच भिकारी!आपलाच पैसा आणि आपणच चोर!अशी अवस्था आता क्लेशदायक वाटू लागली.जनतेच्या खिशातून बळजबरीने पैसा काढून तिजोरी भरली.काही बुडव्यांनी तिजोरी लुटून परदेशी पोबारा केला.हाती उरला झुणझुणा.तिजोरी झाली ठणाठणा.
प्रशासकीय स्तरावर सुद्धा नागरिकांचे आधिकार नरेंद्र मोदींनी कमी करून टाकले.म्हणे सरकारी चोराच्या विरोधात तक्रार करणे गुन्हा ठरेल.सरकारी नोकराने चोरी करणे,कामचोरी करणे, बलात्कार करणे सुद्धा सरकारी कामकाजात सामावेश केला.असे करतांना कोणी नागरिक आडवा आला तर सिधा जेलमधे जाईल.सरकारविरोधात बोलू नका.तसे केले तर देशद्रोहाचे कलम भा.द.वि १२४अ कलम लावून जेलमधे सडवले जाईल. सरकारी नोकराला चोरी करतांना अडवू नका.तसे केल्यास भा.द.वि.३५३ कलम लावून जेलमधे पांच वर्षे डांबले जाईल.आधी दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती.मोदींनी फेब्रुवारी २०१९मधे पांच वर्षे वाढवली. पुन्हा पुन्हा आरटीआय अर्ज केल्यास गुन्हा दाखल होईल.सामाजिक संघटनांनी भ्रष्टाचार विरोधात काम करू नये म्हणून एनजीओत ” भ्रष्टाचार विरोध ” शब्द वापरण्यास मनाई केली.कारण भ्रष्टाचार करणे हा सरकारी नोकर आणि मंत्र्यांचा घटनादत्त अधिकार आहे.मंत्र्यांनो, सरकारी तिजोरी लुटली असेल तर आम्हाला शरण या ,लगान द्या,नाहीतर इडी ची बेडी घालू.” शरण किंवा मरण” यापैकी एकाची निवड करा.राऊत कि शिंदे?
आधीच नागरिकांचे मत ईव्हीएम मशीनमधे टाकून बाहेर कमळ निघते.लोक बोंबा मारतात.माझे मत गेले कुठे?आता तर नागरिकांचे आधारकार्ड मतदान कार्डाशी जोडणे चालू आहे.म्हणे, तुम्ही घरीच बसा,तुमचे मत आम्हीच ठोकून देऊ.नो व्होटींग,नो कम्प्लेन.
कोरोना काळात सरकारने फर्मान काढले.कोरोना बाबत जनतेने बोलू नये.फक्त सरकारी नोकरच बोलेल.तेच खरे समजावे.जर खोटे समजले तर गुन्हा दाखल होईल.बाप रे!कोरोना सुद्धा सरकारी नोकरच होता का? नरेंद्र मोदींनी जनता किती निर्बुद्ध आहे,याची चाचपणी घेतली. लोकांनो, थाळी वाजवा.कोरोनाला कळू द्या कि,हम सब एक है.कोरोना घाबरून पळून जाईल.भारतातील ९० टक्के लोकांनी थाळी वाजवली.अगदी डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकील, वैज्ञानिकांनी सुद्धा! म्हणे , आम्हाला कळते, कि थाळी वाजवल्याने कोरोना पळ काढणार नाही.तो काय चिमणी,कावळा आहे ?पण सरकारशी पंगा नको. कळले तर जेलमधे टाकतील.तक्रार कुठे करणार? पोलिस सरकारचे.कोर्ट सरकारचे.इडी सरकारची.निवडणुक आयोग सरकारचा.आपले आहे तरी कोण?
ही अवस्था काही केल्या झाकता येत नाही.सहन ही होत नाही.मन बधीर करून ठेवावे लागते.बुद्धी लॉक करून ठेवावी लागते.जीभ ब्लॉक ठेवावी लागते.कानात रोज तोच गोंगाट ऐकावा लागतो,” भारत महाशक्ती बन रहा है.” आता जनतेतून आवाज येण्याची आतुरता आहे,” तानाशाही आ रही है.”
✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव