भर पावसात वंचित चा हल्लाबोल आंदोलन

22

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.13ऑक्टोबर):-अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नाही तालुक्यामध्ये विविध समस्येने विळखा घातला आहे.अपंग विधवा परितक्त्यांना वेळेत मानधन मिळत नाही. विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळत नाही. पांदन रस्ते शिवरस्त्यावर अतिक्रमण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. आरोग्य यंत्रणा मस्तावलेली आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये कुठल्याच सोयी सुविधा नाहीत. साधारण आजाराला जिल्ह्यावर रेफर करतात.

भूमीहीन लोकं उदरनिर्वाहासाठी सरकारी जमीन कसून खातात. त्यांच्याकडे पोट भरण्याची कुठल्याही प्रकारचे साधन नाही. ते कसत असलेले सरकारी पट्टे त्यांच्या नावाने करून देण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दाखल असलेले प्रकरणे तात्काळ निकाली काढा.घरकुल बांधकामासाठी वेळेवर रेती मिळत नाही आवाचा सव्वा दरात रेती घ्यावी लागते. त्यासाठी नफा ना तोटा दरात त्यांना रेती पुरवठा करण्यात यावा.

तालुक्यातील 1 ते 2 रेती घाट आरक्षित करून रेती पुरवठा करण्यात यावा,गाव तिथे स्मशानभूमी योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.व दहनशेड बांधकाम करून देण्यात यावे.रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत खराब झालेले रस्ते दुरुस्त करावे, व नव्याने डांबरीकरण करून नवीन रस्ते तयार करण्यात यावे.कठडे नसलेल्या पुलांना तात्काळ कठडे बसविण्यात यावे जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.राष्ट्रीयकृत बँकेत प्रलंबित असलेले कर्ज प्रकरणे निकाली काढावे.बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी नव्याने कर्जपुरवठा करण्यात यावा. संपूर्ण महामंडळाच्या कर्जांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी महिलांचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावे.

रोजगार हमी जॉब कार्ड चे संगणकीकरण केलेले नाही त्यामुळे चुकीचा लेबर बजट दिलेला आहे त्याची चौकशी करावी
अनुसूचित जाती जमाती व भूमिहीनांना शेतमजुरांना प्राधान्याने कामे द्यावी. रोजगार हमीचे काम गुजराती न करता यांत्रिक साह्याने करतात त्यामुळे मुजरांचे स्थलांतर होत आहे.यांत्रिक पद्धतीने काम करणाऱ्या जबाबदार पदाधिकारी व कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्ती विकास कामाचा निधी इतरत्र वळविला जातो. तसे कृत्य करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी.

या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही त्यावर विचार केला जात नाही!!म्हणून दिनांक 12 -10 2022 रोजी वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने ऊपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आंदोलन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या सूचनेनुसारवजॉन्टी उर्फ प्रशांत विनकरे(जिल्हा महासचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, सभापती संबोधी गायकवाड देवानंद पाईकराव,यांच्या नेतृत्वात डी.के.दामोदर (जि.महासचिव) यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी उमरखेड येथे “हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले.

ग्रामीण भागात सोयाबीन काढणी हंगाम सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी शेकडो च्या संख्येने आंदोलनात हजेरी लावली.

भर पावसात आंदोलनाला सुरुवात करून खेड्यापाड्यातुन आलेल्या जनतेने प्रशासनावर हल्लाबोल करत संपूर्ण उमरखेड शहर दणाडून टाकले.

वरील मुद्द्यांना दुर्लक्षित केले तर येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये याही पेक्षा जास्त जनता रस्त्यात उत्तरेल आणि शासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही.वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्यासाठी आंदोलन करीत नाही. जनतेला न्याय मिळेपर्यंत लढा लढत असते.

अशा प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांनी व्यक्त केल्या मुख्य मार्गदर्शक सतीश खाडे (जिल्हा कोषाध्यक्ष) प्रामुख्याने उपस्थित असलेले बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद जय आनंद उबाळे शहराध्यक्ष पुसद, प्रसाद खंदारे पुसद, प्रल्हाद नवसागरे तालुकाध्यक्ष महागाव, देवराव खंदारे तालुका महासचिव महागाव, देवानंद पाईकराव (तालुकाध्यक्ष हदगाव), कोब्रा दवणे (तालुका उपाध्यक्ष हदगाव), सुशील भालेराव, मौलाना सय्यद हुसेन, जिल्हा संघटक, मौलाना शेख मदार शेख चांद, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,विष्णुकांत वाडेकर ता. सहसचिव उमरखेड, भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास कदम, श्याम धुळे भीम टायगर सेना, सिद्धार्थ दिवेकर (निस्वार्थी निर्भीड पत्रकार उमरखेड) प्रफुल दिवेकर (डॉशिंगयुवा नेतृत्व उमरखेड) सिद्धार्थ धोंगडे ज्येष्ठ नेते, बाबुराव नवसागरे ज्येष्ठ नेते, संभाजी मुनेश्वर सर शहराध्यक्ष उमरखेड अर्जुन बरडे ज्येष्ठ नेते, भीमराव हापसे ता. प्रवक्ता उमरखेड, राजाराम काकडे, विनोद गाडगे,रवींद्र हापसे अविनाश दिपके , गजानन धोंगडे, सुमित बनसोड,संदेश बरडे, कुलदीप खडसे, राहुल धुळधुळे,रविभाऊ घुगरे, शुभम गायकवाड, गोलू मुनेश्वर, सुमेध खंदारे (सोशल मीडिया प्रमुख उमरखेड), गौतम चौरे (युवा उद्योजक शेंबाळ पिंपरी), राहुल जोगदंडे, म्याडी नवसागरे, सुमेध नवसागरे, कुलदीप कांबळे, शंकर सूळ, संतोष भवाळ, प्रविण खंदारे, भागोराव धुळे, सह मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान मार्शल विनोद बरडे सर यांनी घेतले.