🔺मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 जुलै):- जिल्ह्यात निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल, लॉज, खाजगी विश्राम गृह (प्रतिबंधीत क्षेत्रातील आस्थापना वगळता) 33 टक्के  या मर्यादित क्षमतेने नियम व अटींच्या आधिन राहून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काल जिल्ह्यात लागू केलेला आहे.

निवासाची व्यवस्था असणारी लॉज, हॉटेल, खाजगी विश्रामगृह यांचेकरीता मागदर्शक सुचना पुढील प्रमाणे आहेत.

अतिरिक्त व्यवस्था सुनिश्चित करणे :

प्रवेश व्दारावर कोविड-19 विषयी प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शक तत्वे पोस्टर्स, स्टॅण्डिज, दृकश्राव्य ( ऑडिओ-व्हिज्युअल ) इत्यादी साधनाव्दारे स्पष्टपणे दर्शविली जातील. हॉटेलमध्ये तसेच बाहेरील पार्किंगमध्ये वाहनतळांचे योग्य व्यवस्थापन केले जाईल. रांग व्यवस्थापित करण्यासाठी विशिष्ठ खुणा केल्या जाऊ शकतात आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा बसण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.

या आस्थापनामध्ये बाहेरील व्यक्तीकडून प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक राहिल. तसेच रिसेप्शन टेबल, त्याजवळील जागेत संरक्षक काच लावण्यात यावा. अतिथींकरिता पॅडलवर चालणाऱ्या हॅन्ड सॅनिटायजरची व्यवस्था ठेवावी. अशी व्यवस्था प्रवेशव्दार, स्वागतकक्ष अतिथींच्या खोल्या, सार्वजनिक खुली जागा (लॉबी इ) येथे करावी.

सदर आस्थापना संचालकांकडून अतिथीस तसेच कार्यरत कामगारांस फेस कवर, मास्क, हँडग्लोव्हज इत्यादी वैयक्तिक संरक्षणात्मक साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. वरील आस्थापना संचालकाकडून प्रत्यक्ष संपर्क न येणाऱ्या प्रक्रिया जसे क्यूआर कोड, ऑनलाईन फार्म,

डिजीटल पेमेंट्स, ई-वॉलेट इत्यादींचा वापर, चेक-इन, चेक-आउट याकरीता करणे आवश्यक राहील.

हॉटेल, लॉज, खाजगी विश्रामगृह इत्यादी ठिकाणी असलेल्या लिफ्टमधील अतिथींची संख्या प्रतिबंधीत ठेवण्यात यावी व सामाजिक अंतराचे निकष योग्य प्रकारे पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी. वातानुकूलन, व्हेंटिलेशनसाठी, सीपीडब्लुडीच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण केले जाईल. जे सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान सेटिंग 24-30 डिग्री सेल्सीअसच्या श्रेणीत असले पाहिजेत. सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्केच्या श्रेणीत असावी, ताजी हवेचे प्रमाण शक्य तितके जास्त असले पाहिजे आणि क्रॉस वेंटीलेशन पुरेसे असावे.

अतिथींसाठी सूचना :

केवळ कोविड-19 सदृश्य लक्षणे नसलेल्या अतिथींना परवानगी असेल. जे अतिथी फेस कवर, मास्क लावले असतील त्यांना प्रवेश देण्यात यावा. सदर ठिकाणी कायम मास्कचा वापर करणे आवश्यक राहील. सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यात दि. 8 जुलै ते दि. 31 जुलै या कालावधीत लागु राहील.

चंद्रपूर, बाजार, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED