राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली

43

🔹तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रनमोचन गावात विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.13ऑक्टोबर):- ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावात ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत जी तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 11 ऑक्टोंबर रोज मंगळवारला ठीक 4:58 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी भगव्या टोप्यांनी परिसर फुलून गेला होता तर अनेक अनुयायांच्या डोळ्यातून अश्रू धारांना वाट मोकळी झाली अशाही परिस्थितीत अनेकांनी सश्रु नयनांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवाभावी अनुयायांचा जनसागर श्रद्धांजली कार्यक्रमासाठी उपस्थित होता.

यावेळी कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून विष्णू तोंडरे (मुख्याध्यापक) ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा प्रभाकर सेलोकर साहेब कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी गुरुदेव सेवा मंडळाचे गुणशेट्टीवार साहेब (आरोग्य विभाग) लक्ष्मणजी दोनाडकर सेवानिवृत्त शिक्षक दलित मित्र प्राध्यापक डी के मेश्राम ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर माजी सरपंच भारत मेश्राम, सुरेश राऊत डोरली तलाठी कैलास पाटील खिरेश्वर ठाकरे ह.भ.प. मेश्राम ताई नन्नावरे सर झुरर्मुरे सर. किरमिरे सर शेडमाके सर , बोळेगावचे माजी पोलीस पाटील सुरेश मुलताने माजी सरपंच मंगेश दोनाडकर, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी दोनाडकर, अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी दोनाडकर यांच्यासह बरेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.रात्री ठीक 9 वाजता विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये जवळपास नऊ महिला मंडळ व वीस पुरुष मंडळींनी भजन स्पर्धेत सहभाग घेतला होता… या भजन स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, सह उद्घाटक म्हणून गडचिरोली येथील माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे अध्यक्षतथा सरपंच संघटना अध्यक्ष सोनुभाऊ नाकतोडे ,गडचिरोली युवा सेनेचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख चंदू उर्फ अमित बेहरे, सेवा सहकारी संस्था चे सुरेश दर्वे,भूषण सातव शिवसेना तालुकाप्रमुख आरमोरी आपला शैलेश चीटमलवार, जंयत दहीकर आरमोरी, सागर मने बांधकाम सभापती नगरपरिषद आरमोरी सामाजिक कार्यकर्ते मोन्टु उर्फ जगदीश पिलारे. रणमोचन ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे , देशोन्नती पत्रकार गोवर्धन दोनाडकर, आरोग्य कर्मचारी चौरू दोनाडकर, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम मेश्राम, संजय प्रधान, मंदा साहारे, कोमल मेश्राम अश्विनी दोनाडकर. पत्रकार विनोद दोनाडकर, आदी मान्यवर उपस्थित होते भजन स्पर्धा कार्यक्रमाची सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी रणमोचन महिला मंडळांनी उद्घाटनीय भजन सादर केले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दिनांक 11 ऑक्टोंबर रोज मंगळवार ला रात्री दहा वाजता सुरुवात झालेल्या भजन स्पर्धेचा शेवट 12 ऑक्टोंबर रोज बुधवार ला दुपारी दोन वाजता झाला..

या भजन स्पर्धेत एकूण 29 स्पर्धकांनी भाग घेतला असून स्पर्धेचे पहिले बक्षीस रोख 11 हजार रुपये अखिल भारतीय पुरुष सेवा मंडळ हिरापूर बोथली यांनी पटकावले तर स्पर्धेचे रोख 9 हजार दुसरे बक्षीस श्री गुरुदेव सेवा मंडळ विहीरगाव यांनी पटकावले तर महिलांमध्ये गुरुबाबा भजन मंडळ आंवळगाव तर दुसरे बक्षीस ढोकनाबाई माता महिला भजन मंडळ कवठा यांनी पटकावले तर तिसरे बक्षीस बरडकिन्ही येथील श्री गुरुदेव महिला भजन मंडळींनी पटकावले.सूत्रसंचालन पराग राऊत तर आभार गोवर्धन दोनाडकर यांनी मांनले..कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून मोतीराम चौधरी पुरुषोत्तम डोंगरवार सर ब्रह्मपुरी, मोरेश्वर ठाकरे ब्रह्मपुरी यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणमोचन येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महोत्सव कमिटी व नवीन आबादी येथील श्री गुरुदेव भक्त मंडळी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.