

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
बिड(दि.13ऑक्टोबर):- जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, तूर, कापुस, उडीद, ऊस व इतर फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले सोयाबीन तसेच वाळविण्यासाठी काढून ठेवलेला सोयाबीन याचे पूर्णतः नुकसान झालेले आहे काही भागात तर अतिवृष्टीने आलेल्या आवकाळीने सोयाबीनचे वाया गेले आहेत तर उडीद, तूर, कापु व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरे तर या वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे.
आता गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही शासनाने शेतकऱ्यांसमोर पंचनाम्याचे गुराळ न गाळता सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर करून अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकर्यांना आत्महत्येपासून वाचवावे अशी मागणी मानवधिक्कार सहायता संघ बिड जिल्हा कार्याध्यक्ष – ओमराजे कांबीकलर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.