सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा…!!

17

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.15ऑक्टोबर):-सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पानसे सर यांच्या मार्गदर्शनात व गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सिनेट सदस्य सौ.किरण संजय गजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला..!!

प्रथमता डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला सहा.शिक्षिका किरण गजपुरे यांनी पुष्पमाला अर्पण करीत आदरांजली अर्पण केली.. यानंतर वर्ग १ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी मराठी,इंग्रजी,हिंदी विषयांच्या पुस्तकांचे तसेच विविध वर्तमानपत्राचे वाचन केले.. यावेळी सहा.शिक्षिका आशा राजूरकर,किरण गजपुरे यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच वाचनाचे महत्व सांगितले…!!

‘जागतिक हात धुवा दिनाचे’ निमित्ताने सहा.शिक्षक. जीवतोडे सर यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात योग्य पद्धतीने हात धुवून दाखविले तसेच हात न धुतल्याने आपल्याला विविध आजार होतात याची माहिती दिली.. व नियमित हात धुत राहण्याचे मुलांना मार्गदर्शन केले…!!सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. शिक्षक आशिष गोंडाने,पराग भानारकर,सहा.शिक्षिका भावना राऊत,पूजा वीर,अंकिता गायधनी,श्रद्धा वाढई यांनी विशेष प्रयत्न केले…!!!