कु. आरती गजभिये यांची जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती

23

✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.16ऑक्टोबर):-भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कु. आरती सिद्धार्थ गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. कुमारी आरती गजभिये सध्या एम पी एस सी ची तयारी करत आहेत व त्याचबरोबर त्यांना साहित्याची सुद्धा आवड आहे.

कविता लिहिणे हा त्यांचा छंद व तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रेतालिंगन व तसेच विजयपथ बुक्समध्ये कोरायटर म्हणून लिखाण केले आहे. सध्या त्या गाव दर्पण न्यूज मध्ये अँकर म्हणून काम करीत आहेत. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच चे अध्यक्ष मा. विशाल सिरसट सर व त्याचबरोबर उपाध्यक्ष मा विजय जायभाये यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.