🔸विकास कार्यासाठी 7 कोटी रूपये मंजूर

✒️ब्रह्मपुरी(रोशन मदनकर, तालुका प्रतिनिधी)

मो:-8888628986

ब्रह्मपुरी( दि8जुलै ): ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील शहरीभागाचा टप्याटप्याने विकास करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी तयार केलेल्या कालबध्द योजनेला सुरुवात झाली आहे. ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली या तीन शहराच्या विकासासाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

नगरविकास विभागाकडे ना. वडेट्टीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास विभाग मंत्रालय यांनी ब्रम्हपूरी नगरपरिषद परिसरात स्विमिंगपुल व उद्यानासाठी 2 कोटी 50 लक्ष रूपये, सिंदेवाही नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 3 कोटी रूपये तसेच सावली नगरपंचयाच्या उद्यान व ग्रिन जिमसाठी 1 कोटी 50 लक्ष रूपये या प्रमाणे 7 कोटी रूपये निधी दिनांक 1 जुलै 2020 च्या परिपत्राकान्वये मंजूर करण्यात आल्याने ना.विजय वडेटटीवार यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.

ब्रम्हपूरी शहरातील परिसरामध्ये स्विमिंग पूलाचे बांधकाम करण्याच्या संदर्भात परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. याबाबत काही नागरिकांनी निवेदन सुध्दा दिलेले होते. त्यावेळेस ब्रम्हपूरीचे आमदार आणि राज्याचे मंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी लवकरच स्विमिंगपूलाचे बांधकाम व उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही,असे शब्द दिले होते. त्यांनी ब्रम्हपूरी येथे स्विमिंग पूलाचे बांधकाम करणे व उद्यानाचे सौदर्यीकरण करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक 1 जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत ब्रम्हपूरी नगपरिषद परिसरात सुसज्य असे स्विमिंगपुलाचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रुपये आणि उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

सिंदेवाही येथील ग्रामपंचायत बरखास्त करून या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे मंत्री ना.विजय वडेटटीवार यांच्या दूरदृष्टीने नगरपंचायतची स्थापना करण्यात आली होती. या नगरपंचायतीचे कामकाज ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये सुरू असून कामकाजाच्या दृष्टीने अयोग्य आहे. ही बाब वडेटटीवार यांना माहित होतीच त्यांनी नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक 1 जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत सिंदेवाही येथील आठवडी बाजार परिसरातील गट क्रमांक 281 मध्ये नगरपंचायतीच्या सर्वसोयीने युक्त सुसज्य अशी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

सावली येथील ग्रामपंचायत बरखास्त करून या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे मंत्री ना. विजय वडेटटीवार यांच्या अथक परिश्रमाने नगरपंचायतची स्थापना करण्यात आली होती. नगरपंचायतीच्या माध्यमातून या शहराच्या विविध विकासकामे करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम तयार करून टप्याटप्याने मोठया प्रमाणात निधी देऊन विकासकाम सूरु केले होते. शहराच्या आवश्यकतेनुसार अद्यावत असे उद्यानाचे बांधकाम करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय येथे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नगर विकास विभाग मंत्रालय यांच्या दिंनाक 1 जुलैच्या शासन परिपत्रकानुसार वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत सावली येथे सर्व सोयीने व अद्यावत असे उद्यान व जिमचे बांधकाम करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

या विभागाचा कायापालट करून उत्कृष्ट नागरी सुविधा बहाल करण्याचे अभिवचन त्यांनी या भागातील जनतेला दिले आहे त्यामुळे या परिसरातील या तीन प्रमुख शहरांमध्ये 7 कोटी रूपयांच्या नागरी सुविधा मिळणार आहे या दूरदृष्टीच्या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED