सातारा जिल्हा बामसेफच्या वतीने म्हसवड येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

17

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17ऑक्टोबर):- सातारा जिल्हा बामसेफ परिवाराच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम (युवा संवाद व जागृती) खास तरुण तरुणी युवकांसाठी म्हसवड,ता.माण,जि. सातारा येथील ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज मध्ये आज रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. संघटने सोबत तरुण जोडले जावेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य मासाळ सर यांच्या हस्ते करणेत आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी महामानवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.कला क्षेत्रातील करियर या विषयावर अष्टपैलू कलाकार महेश सोनावले यांनी मार्गदर्शन केले.
बामसेफ चे राज्य संगठन सचिव एम डी चंदनशिवे यांनी इतिहास, महामानव कार्य, भारतीय संविधान, शिक्षण संधी, लोकतंत्र, चारित्र्यनिर्माण, व्यक्तिमत्त्व जडणघडण, इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. सोबतच विद्यार्थ्यांकडून SWOT ANALYSIS करून घेवून व्यक्तिमत्त्व दिशादर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे झाली यामध्ये अनेक विध्यार्थ्यानी आपल्या मनातील असलेले निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रश्न विचारून त्यांचे निरसन करून घेतले यावेळी एम.डी. चंदनशिवे सर आणि लक्ष्मण मोहिते सरांनी विध्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे देऊन विध्यार्थ्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला.

यावेळी विध्यार्थ्यानी आणि पालकांनीअसे कार्यक्रम म्हसवड शहरात वारंवार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि आमचे भविष्य चांगले घडेल.मूलनिवासी विध्यार्थी संघाचे संयोजक रोहन लोहार यांनी स्वागत केले.बामसेफ चे सातारा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. MKKM चे जिल्हा उपाध्यक्ष कैलास तोरणे, बामसेफ जिल्हा कार्यकारिणी सदस्य विठ्ठल जाधव,सुशील त्रिगुने, योगेश सरतापे, पुन्यजित,भारतीय बौद्ध महासभेचे सचिन सरतापे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.यावेळी विवीध कॉलेजेस मधून 50 पेक्षा जास्त विध्यार्थी युवक युवती आणि छोटे विध्यार्थी उपस्थित होते.