‘हा’ तर लोकशाहीचा खून आणी संविधानानाची पायमल्ली-रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांचे मत.

34

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.17ऑक्टोबर):- 166 अंधेरी विधानसभा पोट निवडणुकितील निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आणी भारतीय संविधानाची पायमल्ली होय असं मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

आईच्या गर्भातून नाही तर मतपेटीतून राजाचा जन्म होने म्हणजे लोकशाहीला धरून आहे.कोणती परमपरा आणी संस्कृती मानून भाजपा ने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला हा फार चुकीचा आहे.

संविधान विरोधी कारवाया करणे भाजपा थांबवत नसून सत्तेतून पायउतार होने फार वेळ नाही. सहानुभूती तर कायद्याच्या आणी संविधांच्या कुठल्या चौकटीत कलम असून कोण्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.

सदर निर्णाय म्हणजे उमेदवाराची राजकीय कुचंबणा व लोकशाहीचा गळा घोटून संविधांनाची पायमल्ली करणे होय. यामुळे रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

मागील दीड वर्षात महाराष्ट्रात ३ पोटनिवडणूक झाल्यात.
पंढरपूर विधानसभेत कै. नाना भालके यांचे चिरंजीव, कोल्हापूर उत्तरला कै.चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आणि देगलूर विधानसभेला कै.अंतापुरकर यांचे चिरंजीव निवडणुकीला उभे होते मग तेव्हा भाजपाची संस्कृती कुठे अकलेचे तारे तोडत होती.

लोकशाहीची लक्तरे काढून घराणेशाहीला समर्थन देणाऱ्या
या प्रकरणात मायेचे फार मोठे गुपित लपले असून या प्रकरनाची सी बी आई मार्फत चौकशी व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची लवकरच भेट घेनार् असल्याचे सुतोवाच डॉ. माकणीकर यांनी काढले.